Mohali Blast: मोहालीवर हल्ला केलाय, पुढचं टार्गेट शिमला; SFJ चा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mohali Blast

Mohali Blast: मोहालीवर हल्ला केलाय, पुढचं टार्गेट शिमला; SFJ चा इशारा

मोहाली : पंजाबमधील मोहालीमध्ये इंटेलिजन्सच्या इमारतीवर रॉकेट हल्ला झाला होता. दरम्यान या हल्ल्याची जबाबदारी शीख फॉर जस्टीस (SFJ) या खलिस्तानी संघटनेने घेतली आहे. दरम्यान या संघटनेने हिमाचलमध्ये खलिस्तानी झेंडे फडकवण्याचा इशारा दिला होता. मोहालीमध्ये झालेल्या हल्ल्याचीही जबाबदारी त्यांनी घेतली असून पुढचा हल्ला करण्याची धमकीही त्यांनी दिली आहे.

दरम्यान आज पहाटे मोहाली येथील इंटेलिजन्स ब्युरोच्या मुख्यालयावर ड्रोन हल्ला करण्यात आला होता. शीख फॉर जस्टीस या खलिस्तानी संघटनेचे अध्यक्ष गुरपतवंत सिंग पन्नू यांनी या हल्ल्याची जबाबदारी घेतली असून त्यांनी सांगितलं की, मोहालीवर हल्ला आम्ही केला असून पुढील हल्ला हिमाचलमधील शिमल्यावर असणार आहे. त्यांच्या या इशाऱ्यानंतर पंजाबमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

हेही वाचा: पुलित्झर पुरस्काराची घोषणा: भारतातील पत्रकारांचा समावेश; पाहा यादी

शीख फॉर जस्टीस या संघटनेने हिमाचलप्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनाही पत्र लिहून धमकी दिली होती. त्यानंतर त्यांनी हिमाचलच्या शिमला येथे असलेल्या विधानसभेच्या गेटवर खलिस्तानी झेंडे लावले होते. त्यानंतर हिमाचलमध्ये सीमाबंदी करण्यात आली होती आणि कडक सुरक्षा तैनात करण्यात आली होती. त्यानंतर SFJ चा मुख्य पन्नू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आज पहाटे मोहालीमध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर मुख्यमंत्री भगवंत माण यांनी आरोपींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे.

हेही वाचा: मनसे नेते पोलिस आयुक्तांच्या भेटीला; वसंत मोरेंचं 'एकला चलो रे'

पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांनी ट्वीट करत म्हटलंय की, "याप्रकरणी काही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून आज सायंकाळपर्यंत अजून आरोपींना अटक करण्यात येणार आहे." त्यांनी याप्रकरणी बैठक बोलावली असून राज्याचे पोलिस महासंचालक यांच्यासहित मोठ्या अधिकाऱ्यांचा सामावेश असणार आहे. "ही घटना चिंतीत करणारी असून पंजाबमध्ये शांतता राखण्यासाठी राज्य आणि देशाने प्रयत्न करायला पाहिजेत. पंजाबमधील अशा परिस्थितीचा परिमाण देशावर होईल." असं कॉंग्रेसचे नेते मनिष तिवारी यांनी सांगितलं आहे.

दरम्यान SFJ ने पुढचे टार्गेट शिमला हे असल्याचा इशारा दिल्यावर हिमाचलमध्ये सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

Web Title: Mohali Drone Attack Ib Office Sfj Responsibility Shimla Attack

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top