कोरोना महामारी पाठोपाठ आलेल्या मंकीपॉक्स घातक

मंकीपॉक्सचा विषाणू लसीला देखील जुमानत नाही.
monkeypox
monkeypoxSakal

नवी दिल्ली : कोरोना महामारी पाठोपाठ आलेल्या मंकीपॉक्स या रोगाची घातकता वाढत चाललेली असतानाच, मंकीपॉक्सचा विषाणू लसीला देखील जुमानत नाही, असे ताजे निरीक्षण जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) नोंदवले आहे. मागच्या आठवडाभरात मंकीपॉक्सची रूग्णसंख्या ७५०० पर्यंत वाढली व यात २० टक्के वाढ झाली हे गंभीर आहे असाही इशारा देण्यात आला.

डब्ल्यूएचओचे तांत्रिक प्रमुख रोसमंड लुईस व महासंचालक टेड्रोस अदनॉम घेबियस यांच्या म्हणण्यानुसार एका आठवडाभरात मंकीपॉक्सची रूग्णसंख्या २० टक्क्यांनी वाढणे गंभीर आहे. यावर लसदेखील प्रभावी ठरत नसल्याने लोकांना त्याच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी लोकांनी स्वतःच काळजी घेणे आवश्यक आहे. या रोगाची लागण झालेले लोक काही आठवड्यात बरे होतात असे आढलले तरी त्याचा धोका कमी होत नाही असेही डब्ल्यूएचओने म्हटले आहे. सुरवातीला खोकला, सर्दी, ताप, हातापायाच्या बोटांवर फोड येणे असी लक्षणे आढलतात व पहाता पहाता हा रोग गंभीर रूप धारण करतो असे वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे.

जगभरातील ९२ देशांत सध्या मंकीपॉक्स रूग्णांची संख्या ३५ हजारांवर पोहोचली आहे. आतापावेतो मृतांचा आकडा १२ असून सध्या तरी युरोप अमेरिकेपुरता याचा प्रभाव जास्त असल्याचे डब्ल्यूएचओचे निरीक्षण आहे. मात्र भारतासह जेथे त्याचे रूग्ण आढळत आहेत अशा अन्य देशांनीही योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. खासकरून लोकांनी वैयक्तिक स्वच्छतेची काटेकोर काळजी घ्यायला हवी असाही सावधगिरीचा सल्ला देण्यात आला आहे. लुईस यांच्या म्हणण्यानुसार सध्या जी लस उपलब्ध आहे ती मंकीपॉक्सच्या रूग्णांवर १०० टक्के प्रभावी ठरत नसल्याचे आढळले आहे. अर्थात आम्ही यावरील प्रभावी लसीचे लवकरात लवकर संशोधन होईल अशी आशा करत आहोत.

मंकीपॉक्सचा धोका पुरूषांशी लैंगिक संबंध ठेवणाऱया स्६पुरूषांना असल्याचेही निष्कर्ष डब्ल्यूएचओकडे आले आहेत. याशिवाय लहान बालके, गर्भवती महिला व कमी प्रतीकारक्षमता असलेल्या लोकांनाही मंकीपॉक्सचा धोका जास्त असल्याचे डब्ल्यूएचओचे म्हणणे आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com