राष्ट्रवादीचा फडणवीसांना धक्का ते ग्रेटा-रिहानाचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, ठळक बातम्या एका क्लिकवर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 3 February 2021

पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने भारतात सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. याआधी सुप्रसिद्ध जागतिक पॉप आयकॉन सुपरस्टार रिहाना हिने देखील शेतकरी आंदोलनाबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.

पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने भारतात सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. याआधी सुप्रसिद्ध जागतिक पॉप आयकॉन सुपरस्टार रिहाना हिने देखील शेतकरी आंदोलनाबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची शहरातील तीन नगरसेवकांनी भेट घेतली. त्यामुळे ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. यासह महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...

नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर गेल्या 69 दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. ऐन कडाक्याच्या थंडीतही शेतकऱ्यांचा निर्धार ढळला नाहीये. वाचा सविस्तर

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची शहरातील तीन नगरसेवकांनी भेट घेतली. त्यामुळे ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. वाचा सविस्तर

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून भाजपशासित राज्यांमध्ये 'लव्ह जिहाद'च्या कथित मुद्यांवरुन आंतरधर्मीय विवाहांना प्रतिबंध करणारे कायदे पारित केले गेले आहेत. वाचा सविस्तर

मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा 2021-22 या वर्षाचा अर्थसंकल्प बुधवारी (ता. 3) आयुक्त इक्‍बालसिंह चहल स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना सुपूर्द करणार आहेत. वाचा सविस्तर

म्यानमार : सोमवारी म्यानमारच्या लष्कराने सत्ताधारी नॅशनल लीग फॉर डेमोक्रॅसी (एनएलडी) च्या नेत्यांना ताब्यात घेऊत सत्तापालट केला आहे. वाचा सविस्तर

मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे कट्टर राजकीय विरोधक अ‍ॅलेक्सी  नवाल्नी यांच्याविरोधात कोर्टाने कठोर निर्णय घेतला आहे. वाचा सविस्तर

सहकारनगर (पुणे) : दहा बाय दहा आकाराचं झोपडपट्टीत घर, घरची परिस्थिती हलाखीची, पण असं असतानाही परिस्थितीवर मात करून सिद्धार्थनगर येथील विकास अर्जुन लोखंडे याने चार्टर्ड अकाउटंट म्हणजे सीएची परीक्षा उत्तीर्ण होत घवघवीत यश संपादन केलं आहे. वाचा सविस्तर

नाशिक : गुजरातमधील दोन बाजारपेठांमधून दिवसाला पन्नास हजार पोत्यांमधून कांदा विक्रीसाठी येतो आहे. वाचा सविस्तर

सोलापूर : होटगी रोडवरील विमानतळ परिसरातील श्री सिध्देश्‍वर साखर कारखान्याची बेकायदेशीर चिमणी पाडकामाची कार्यवाही महापालिकेने हाती घेतली आहे. वाचा सविस्तर

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सर्वसामान्यांच्या जीवनावर थेट परिणाम होणार आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणाऱ्या काही घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. वाचा सविस्तर

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Morning News updates Rihanna Greta Thunberg Farmer Protest BMC alexei navalny russia Vladimir Putin