esakal | होम क्वारंटाइनचा शिक्का पुसून केला रेल्वे प्रवास...
sakal

बोलून बातमी शोधा

mother and son wipe home quarantine stamp and travel to train at up

आई आणि मुलाच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारल्यानंतरही त्यांनी तो पुसून रेल्वेने प्रवास केला. दोघांची चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

होम क्वारंटाइनचा शिक्का पुसून केला रेल्वे प्रवास...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

पिलभीत (उत्तर प्रदेश) : आई आणि मुलाच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारल्यानंतरही त्यांनी तो पुसून रेल्वेने प्रवास केला. दोघांची चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

रस्त्यावर फिरण्यासाठी त्याने लढवली शक्कल पण...

महिला आणि तिचा मुलगा परदेश दौऱयावरून आले होते. मुंबई विमानतळावर आरोग्य विभागाने त्यांच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारला. त्यांनी तो शिक्का पुसून मुंबई-लखनौ रेल्वे प्रवास केला. लखनौमध्ये पोहोचल्यावर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.  या महिलेसोबत आलेले इतर प्रवासीही संशयित आहे. त्यांनाही होम क्वारंटाइन राहण्याची सूचना देण्यात आली आहे.

लॉकडाऊन असताना प्रियकर पोहचला तिच्या घरी अन्...

दरम्यान, स्थानिक प्रशासनाची झोप उडाली आहे. या मायलेकांच्या कुटुंबातील आणि संपर्कात आलेल्यांची तपासणी करण्याचे काम आरोग्य विभागाने हाती घेतले आहे.

सामूहिक बलात्कारानंतर ती रांगत-रांगत रस्त्यावर आली...

loading image