Prashant Uike Inspirational Journey
esakal
Prashant Uike road accident MPPSC success story : यशाचा मार्ग नेहमीच सरळ आणि सोपा असतो असं नाही. अनेकदा संकटं, अपयश आणि परिस्थिती माणसाची खरी परीक्षा घेतात. मात्र, या अडचणींवर मात करून पुन्हा उभं राहण्याची जिद्द असेल, तर अशक्य वाटणारं ध्येयही साध्य करता येतं. मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील प्रशांत उईके यांची कहाणी याचंच प्रेरणादायी उदाहरण आहे.