Mughal History : आपल्या मुलीच्या प्रियकराला पाण्यात उकळवून मारणारा मुघल बादशाह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mughal History

Mughal History : आपल्या मुलीच्या प्रियकराला पाण्यात उकळवून मारणारा मुघल बादशाह

Mughal History : बादशाह हुमायूँपर्यंत मुघल राजकुमारींच्या विवाहांचे उल्लेख सापडतात. बादशाह अकबरानेही त्याच्या सावत्र बहिणीचं लग्न अजमेर जवळच्या एका प्रांतातील सत्ताधीशाशी लावून दिलं होतं. अकबराच्या या मेव्हण्याने त्याच्या विरोधात बंड केलं. त्या वेळी मुघल शहाजाद्यांमध्ये आधीच बादशाह होण्यासाठी स्पर्धा लागलेली असायची.

आता या स्पर्धेत जावईसुद्धा सहभागी झाले, तर मुघल साम्राज्याचं काय होईल, असा विचार अकबराने केला होता. दुसऱ्या मुघल बादशाहांचं स्थान इतकं उंचावत गेलं होतं की आपल्या मुलींचं लग्न कुठल्या घराण्यात लावावं ही त्यांच्या समोरची एक व्यावहारिक अडचण होऊन गेली. बादशाहाच्या तोडीसतोड स्थान कोणाचं असणार? त्याने कोणाला आपली मुलगी दिली तर त्या माणसाचं स्थानही उंचावणार, त्यामुळे भविष्यात तो माणूस मुघल साम्राज्याला आव्हान देण्याचीही भीती वाढणार.

याच कारणामुळे मुघलांमध्ये मुलींचे लग्न नातेवाईकांमध्ये लावून द्यायची प्रथा सुरू झाली. त्याची सुरुवात सम्राट अकबराने केली होती. पण मुघल साम्राज्यात एक मुलगी मात्र कायम अविवाहितच राहिली. तिचं ना जहाँआरा फ्रेंच इतिहासकार फ्रांस्वा बर्नियर यांनी 'ट्रॅव्हल्स इन द मुघल एम्पायर' या पुस्तकात लिहिल्यानुसार, "शाहजहान आणि मुमताजची मुलगी जहाँआरा खूप सुंदर होती. शाहजहान तिच्यावर वेड्यासारखं प्रेम करायचा. जहाँआरा स्वतःच्या वडिलांची इतकी काळजी घ्यायची की शाही भोजनामध्ये वाढले जाणारे सर्व पदार्थ जहाँआराच्या नजरेखाली शिजवले जात असत.

शाहजहानचे स्वतःच्या या मुलीसोबत अवैध संबंध असल्याचं त्या काळी सर्वत्र बोललं जात असे. स्वतः लावलेल्या झाडाची फळं चाखायचा अधिकार बादशाहाला आहेच, असंही काही दरबारी मंडळी पुटपुटत असत.

इतिहासकार निकोलाओ मनुची मात्र या प्रतिपादनाचं खंडन करतात. बर्नियर यांचं म्हणणं पूर्णतः पोकळ आहे, असं ते म्हणतात. पण जहाँआराचे काही प्रियकर तिला लपूनछपून भेटायला येत असत, हेही मनुची नमूद करतात.जहाँआरा आयुष्यभर अविवाहित राहिली, याबद्दलही अनेक तर्कवितर्क लढवले जातात. तिला तिच्या तोडाचा कोणी माणूस मिळाला नाही, असा एक तर्क आहे.

फ्रेंच इतिहासकार फ्रांस्वा बर्नियर लिहितात, शाहजहानला कोणीही आपल्या मुलीच्या आसपास पोहोचलेल आवडायचं नाही. त्यामुळेच राजकुमारीच्या सुरक्षेसाठी विशेष काळजी घेण्यात आली होती.सर्व रक्षक असूनही जहांआराचा एक प्रियकर तिला भेटायला पोहोचला. बादशाहच्या जवळच्या लोकांनी ही माहिती त्याला दिली आणि तो संतापला. त्याने त्या प्रियकराला पकडण्याचा आदेश दिला. सैनिक त्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याआधीच जहाँआरा कळलं की त्याची चर्चा संपूर्ण राजवाड्यात सुरू झाली आहे.

जहाँआरा त्याला वाचवण्यासाठी पाण्याच्या भांड्यात त्याला लपवलं. सर्व प्रयत्न करूनही जेव्हा जहाँआरा प्रियकर सापडला नाही तेव्हा बादशाह स्वतः राजकन्येच्या खोलीत पोहोचला. प्रियकर पाण्याच्या भांड्यात लपला असल्याचा संशय त्याला आला. त्याच वेळी, बादशहाने कढईतील पाणी उकळण्याची आज्ञा दिली आणि यातच त्या प्रियकराचा मृत्यू झाला.

जेव्हा दुसर्‍या व्यक्तीने जहाँआरासोबत लग्न करण्याचा प्रयत्न केला तेव्हा यासाठी त्याला विष देऊन मारण्यात आल्याचंही सांगितलंजातं. अशा प्रकारांमुळे जहाँआरा मात्र आयुष्यभर अविवाहित राहिली

टॅग्स :love storyHistory