शरीरसंबंधानंतर लग्नास नकार देणे फसवणूक नाही! मुंबई उच्च न्यायालय

शरीरसंबंधानंतर लग्नास नकार देणे फसवणूक नाही! मुंबई उच्च न्यायालयाने केली तरुणाची निर्दोष मुक्तता
Mumbai
Mumbaisakal
Summary

प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप प्रेयसीने केला होता.

प्रदीर्घ काळ शारीरिक संबंध ठेवल्यानंतर जर कोणी लग्नास नकार देत असेल तर ती फसवणूक (Fraud) मानता येणार नाही. एका तरुणाला दोषी ठरवण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयात बदल करताना मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) ही टिप्पणी केली आहे. पालघर येथील रहिवासी काशिनाथ घरत याच्या विरुद्ध त्याच्या प्रेयसीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कलम 376 आणि 417 नुसार अत्याचार आणि फसवणुकीचा गुन्हा (Crime) दाखल केला होता. काशिनाथने लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप प्रेयसीने केला होता. या प्रकरणात, 19 फेब्रुवारी 1999 रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी (Additional Sessions Judge) काशिनाथला अत्याचाराच्या आरोपातून मुक्त केले होते, परंतु फसवणूक केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. (Mumbai High Court acquits youth on charges of cheating on marriage)

Mumbai
जगात हाहा:कार, भारतात शांत! एका दिवसात केवळ 5326 नवीन कोरोना रुग्ण

लग्नाच्या आश्वासनावर तीन वर्षे संबंध ठेवल्याप्रकरणी आणि नंतर तो फेटाळल्याप्रकरणी न्यायालयाने काशिनाथला एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. घरत याने या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले, जेथे न्या. अनुजा प्रभुदेसाई (Justice Anuja Prabhudesai) यांच्या खंडपीठाने त्याला फसवणुकीच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले. न्या. प्रभुदेसाई म्हणाल्या की, वस्तुस्थिती दर्शवते की, महिला आणि आरोपीमध्ये तीन वर्षांपासून शारीरिक संबंध होते आणि दोघांचे प्रेमसंबंध होते. महिलेच्या वक्तव्यावरून तिला कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीत (Cheating) ठेवण्यात आले असल्याचे सिद्ध होत नाही.

या खटल्याच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने अशा प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्णयांचा संदर्भ दिला. न्यायालयाने म्हटले, की महिलेला लग्नाचे आश्वासन देताना खोटे तथ्य समोर ठेवण्यात आले आणि नंतर त्या गोष्टी चुकीच्या असल्याचे सिद्ध झाले, या दोन गोष्टी सिद्ध कराव्या लागतील. पहिली म्हणजे खोटी माहिती देऊन लग्नाची चर्चा झाली अन्‌ दुसरी म्हणजे दिलेले वचनच चुकीचे होते आणि त्याच्या भ्रमात महिलेने शरीरसंबंध ठेवण्यास सहमती दिली.

Mumbai
'मी मुस्लिम आहे म्हणून..' या वक्तव्याने तुर्कस्तानचे चलनच कोसळले

चुकीची माहिती देऊन शरीरसंबंध ठेवल्याचा पुरावा सापडला नाही

उच्च न्यायालयाने सांगितले की, या प्रकरणात आरोपीला महिलेशी लग्न करायचे नव्हते हे दाखवणारा कोणताही पुरावा नाही. खोटी माहिती देऊन महिलेला आरोपीने शारीरिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त केले होते, हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे तथ्य नाही. त्यामुळे प्रदीर्घ नातेसंबंधानंतर लग्न करण्यास नकार दिल्यानंतर फसवणूक केली म्हणून दोषी ठरवता येणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com