राजस्थानात काँग्रेससह अपक्ष आमदार हॉटेलवर हलवले, भाजपकडून घोडेबाजार?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 June 2020

राज्यसभा निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यातील अपक्ष आमदारांना भाजपकडून प्रलोभन दाखविले जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. 

जयपूर, ता. ११ (पीटीआय) : राजस्थानमध्ये राज्यसभा निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यातील अपक्ष आमदारांना भाजपकडून प्रलोभन दाखविले जात असल्याचा आरोप केला जात असून निवडणुकीची रणनिती ठरवण्यासाठी काल मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मुख्यमंत्री निवासस्थानी बैठक बोलावली होती. त्यानंतर कॉंग्रेसने अपक्षांसह ११० आमदारांना जयपूरच्या हॉटेल शिवविलास येथे हलविले. त्यानंतर गेहलोत यांनी हॉटेलमध्ये जाऊन आमदारांची भेट घेऊन एकजूट राहण्याचे आवाहन केले. दरम्यान, आरोप सिद्ध करून दाखवावेत, असे आव्हान राजस्थान भाजपने दिले आहे. 

राजस्थानात येत्या १९ जून रोजी तीन जागांसाठी राज्यसभेच्या निवडणुका होत आहेत. यामुळे कॉंग्रेसकडून रणनिती आखली जात आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले, की राज्यात कॉंग्रेस आणि अपक्ष आमदार एकत्र असून कोणत्याही स्थितीत घोडेबाजार होऊ देणार नाही. भाजपकडून पाच ते दहा कोटीची ऑफर दिली जात असून पैसेदेखील ट्रान्सफर होत असल्याची माहिती मिळत असल्याचे ते म्हणाले. राजस्थानातील राज्यसभेच्या निवडणुका दोन महिन्यांपूर्वीच होऊ शकल्या असता. परंतु गुजरात आणि राजस्थानमध्ये भाजपला आमदारांची पळवापळवी करता न आल्याने भाजपने उशीर केल्याचे, गेहलोत म्हणाले.

हे वागणं बरं नव्हं : पृथ्वीराज चव्हाणांचा संरक्षणमंत्र्यांना टाेला

कॉंग्रेसचे महेश जोशी यांनी एसीबीकडे पत्र लिहून आमदारांना पैशाचे आमिष दाखवले जात असल्याची तक्रार केली आहे. याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यादरम्यान जयपूरमध्ये मोठी रक्कम ट्रान्सफर झाल्याचा सुगावा लागला असून त्याची चौकशी सुरू झाली आहे. 

भाजपकडे जनमत नाही. त्यांचा इतिहासच मुळातच लोकशाहीची तोडफोड करण्याचा आहे. परंतु राजस्थानाची वीर भूमी भाजपचे षड्‌यंत्र कधीही यशस्वी होऊ देणार नाही. 
रणदीप सुरजेवाला, कॉंग्रेस नेते 

दिलासादायक! देशात पहिल्यांदाच बरे झालेल्यांची संख्या कोरोनाबाधितांपेक्षा अधिक​

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी उमेदवार निश्‍चित केलेले असताना कोणत्याही प्रकारचा संभ्रम बाळगण्याची गरज नाही. कॉंग्रसचे सर्व आमदार एकजूट आहेत. दोन्ही जागा कॉंग्रेस जिंकेल. 
सचिन पायलट, उपमुख्यमंत्री 

पवारांनीच सर्कस असल्याचे केले मान्य ! चंद्रकांत पाटील यांची राजनाथसिंह-पवार वादात उडी

वसुंधरा राजे समर्थक आमदारांवर नजर 
माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या जवळचे अपक्ष आमदार हे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडे जाऊ शकतात, अशी खबर आहे. त्यापैकी अनेक अपक्ष कॉंग्रेसला पाठिंबा देऊ शकतात. भाजपचे बंडखोर आणि अपक्ष आमदार ओमप्रकाश हुडला यांनी आम्ही गेहलोत यांच्यासमवेत असल्याचे म्हटले आहे. वसुंधरा राजे यांचे निकटवर्ती असल्याबद्दल विचारले असता, काळानुसार निर्णय घ्यावे लागतात, असे ते म्हणाले. 

यानिमित्ताने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची झटकली गेली मरगळ

कॉंग्रेस आपले अपयश झाकण्यासाठी भाजपवर आरोप करत आहे. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे ज्यांनी ५५ वर्षे घोडेबाजार केला, तेच आता भाजपला दोष देत आहेत. कॉंग्रेस पक्षातच अंतर्गत कलह आहे. आमदार पळवत असल्याचा एकतरी आरोप कॉंग्रेसने सिद्ध करून दाखवावा. 
सतीश पुनिया, भाजपचे प्रदेशाध्यक्ष. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

अशी होणार निवडणूक 
कॉंग्रेसने के. सी. वेणुगोपाल आणि नीरज डांगी यांना तर भाजपने राजेंद्र गेहलोत आणि ओकार सिंह यांना मैदानात उतरवले आहे. संख्याबळाचा विचार केल्यास भाजपकडे केवळ १ उमेदवार निवडणून आणण्याइतपत पाठबळ आहे. प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी किमान ५१ मते मिळणे आवश्‍यक आहे. कॉंग्रेसला दोन्ही उमेदवार आणायचे असतील तर १०२ मतांची गरज आहे. कॉंग्रेसकडे १३ अपक्षांबरोबरच डावे, बीटीपीचे प्रत्येकी दोन आणि आरएलडीचे आमदारांचे पाठबळ आहे. भाजपकडे स्वत:चे ७२ आमदाराशिवाय तीन आरएलपीचे आमदार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajsthan congress and other MLA Shifted to hotel