
पतीसोबत नव्हे प्रियकरासोबत राहायचं होतं; पत्नीनंच काढला काटा
गाझियाबादच्या नंदग्राम पोलीस स्टेशन परिसरात १ मे रोजी भाजी विक्रेत्याच्या झालेल्या हत्येचा खुलासा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी मृताची पत्नी आणि तिच्या प्रियकरासह तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून खुनात वापरलेली ब्लँकेट, विषारी पावडरची डब्बी, नशेच्या गोळ्यांचे रॅपर आदी साहित्य जप्त केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राकेश कुमार शर्मा हा मूळचा अनुपशहर बुलंदशहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परळी गावचा रहिवासी असून तो नंदग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवीन वस्तीत पत्नी कुसुमसोबत राहत होता. तो भाजीचा गाडा लावायचा. (A woman killed her husband with the help of her lover in Ghaziabad)
हेही वाचा: व्हायग्रा घेऊन आला 81 वर्षाचा पती; पत्नीने नकार दिल्याने केले वार
खून करून नैसर्गिक मृत्यू असल्याचा बनाव-
नंदग्रामचे एसएचओ अमित कुमार यांनी सांगितले की, 1 मे रोजी राकेश कुमारचा घरात संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. राकेश बेशुद्ध पडला असून त्याला श्वासही घेता येत नसल्याची माहिती त्याची पत्नी कुसुमने आपला दिर मुकेश यांना दिली होती. माहिती मिळताच बुलंदशहरहून आलेल्या नातेवाईकांनी राकेशला रुग्णालयात नेले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, 2 मे रोजी अंत्यसंस्कार करण्यापूर्वी राकेशच्या शरीरावर जखमेच्या खुणा पाहून कुटुंबीयांना संशय आला. त्यानंतर त्यांनी अनुपशहर पोलिसांना माहिती दिली. अनुपशहर पोलिसांनी बुलंदशहरमध्ये मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केले. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये राकेशची हत्या झाल्याची पुष्टी झाली आहे. यानंतर कुटुंबीयांनी कुसुमवर खुनाचा संशय व्यक्त केला.
हेही वाचा: पत्नीचे पतीसमोरच प्रियकराशी शारीरिक संबंध; संतापलेल्या पतीने...
प्रियकरासोबत गेली होती पळून-
नंदग्रामचे एसएचओ अमित कुमार म्हणाले की, कुसुमची कोठडीत चौकशी केल्यानंतर तिने पतीची हत्या केल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी कुसुमचा प्रियकर मनोज आणि त्याचा साथीदार गौरव चौहान रा. बुलंदशहर यालाही अटक (Arrest) केली.
प्रेमप्रकरणामुळे कुसुम दहा महिन्यांपूर्वी प्रियकर मनोजसोबत गेली होती. परंतु पती आणि सासरच्या लोकांनी समजवल्यानंतर कुसुम परत आली होती. मनोजशी तिचं बोलणं चालूच होतं. तिने मनोजसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता, पण तिचा नवरा तिच्या मार्गात अडथळा ठरत होता, त्यामुळे दोघांनी मिळून तिच्या हत्येचा कट रचला. 1 मे रोजी कुसुमने पतीला पावडरमध्ये नशेच्या गोळ्या मिसळून पाजले. झोपल्यानंतर मनोज आणि त्याचा साथीदार गौरव यांनी राकेशचा चेहरा ब्लँकेटने दाबून खून केला.
Web Title: Murder In Ghaziabad A Woman Killed Her Husband With The Help Of Her Lover
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..