
धर्मांतर करून वसीम रिझवीचे जितेंद्र त्यागी झालेल्या शिया वक्फ बोर्डाच्या माजी अध्यक्षांनी आता इस्लाम सोडून सनातन धर्म स्वीकारणाऱ्यांसाठी मोठी घोषणा केलीय. धर्म परिवर्तन करून हिंदूंचे मुस्लीम झालेल्यांना घरवापसीचं आवाहन जितेंद्र त्यागी यांनी केलंय. इतकंच नाही तर धर्म परिवर्तन करून सनातन धर्म स्वीकारणाऱ्या मुस्लिमांना दर महिन्याला ३ हजार रुपये देण्याची घोषणासुद्धा त्यांनी केलीय. प्रयागराज इथं महाकुंभ मेळ्यात संगमावर स्नान करण्यासाठी आले असताना त्यांनी ही घोषणा केली. दर महिन्याला ३ हजार रुपयांशिवाय उद्योगासाठीही मदत करण्यात येणार असल्याचं जितेंद्र त्यागी यांनी म्हटलं.