
कांचनजंगा पर्वताच्या चढाईदरम्यान नेपाळमध्ये भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू
काठमांडू : जगातील तिसऱ्या सर्वांत उंच शिखराच्या चढाईदरम्यान भारताच्या गिर्यारोहकांचा मृत्यू झाला आहे. जगातील तीसरे उंच शिखर कांचनजंगा यावर चढाई करत असताना ही घटना घडली असून नेपाळमधील हिमालयाच्या चढाईदरम्यान झालेला हा वर्षातील तिसरा मृत्यू आहे.
(Climber Death In Nepal)
नारायण अय्यर (५२) असं या गिर्यारोहकाचं नाव असून ८२०० मीटर उंची असलेल्या कांचनजंगा पर्वतावर चढाईच्या शेवटच्या टप्प्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. "मोहिमेदरम्यान तो खूप थकला होता, आम्हाला मदत करण्यासाठी आमच्याकडे दोन मार्गदर्शक होते पण तो पुढे चालू शकत नव्हता, तो चालता चालता पडला." असं अॅडव्हेंचर कंपनीच्या निवेश कार्की या संयोजकाने सांगितले. तसेच आम्ही त्यांच्या कुटुंबियांना घटनेची माहिती दिली असून त्याचा मृतहेद मिळवण्यासाठी सध्या आमचे प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.
हेही वाचा: इस्त्राईलमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर अज्ञातांकडून गोळीबार; 3 ठार
नेपाळ सरकारने यावर्षीच्या हंगामात जगभरातील जवळपास ६८ गिर्यारोहकांना या शिखरावर चढण्यासाठी परवानगी दिली होती. त्यामधील काही गिर्यारोहकांनी गुरूवारी या शिखरावर यशस्वी पाऊल ठेवले होते. त्यादरम्यान यावर्षी तीन गिर्यारोहकांचा मृत्यू झाला असून अय्यर हे तिसरे आहेत. मागच्या महिन्यात एका ग्रीक गिर्यारोहकाचा ८१६७ मीटर असलेल्या धौलगिरीवर खाली उतरताना मृत्यू झाला होता. त्यानंतर माऊंट एव्हरेस्टवर काही सामान घेऊन जात असताना एका नेपाळी गिर्यारोहकाचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा: असं वाटतंय की इंग्रज बरे होते - संजय राऊत
नेपाळमध्ये जगातील सर्वांत उंच असे आठ शिखरं असून जगभरातील अनेक गिर्यारोहक चढाईसाठी येत असतात. त्यामध्ये कमी तापमानामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. २०२० मधील कोरोनाच्या साथीनंतर गेल्या वर्षी नेपाळने गिर्यारोहकांसाठी परवानगी देण्यास सुरूवार केली आहे. नेपाळ सरकारने यावर्षीच्या हंगामात ९१८ गिर्यारोहकांना परवानग्या दिल्या असून त्यातील ३१६ जण माऊंट एव्हरेस्टवर चढाई करणार आहेत.
Web Title: Narayan Ayyer Death In Mount Kanchanjanga Hill Climbing Nepal
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..