इस्त्राईलमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर अज्ञातांकडून गोळीबार; 3 ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Israel

इस्त्राईलमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर अज्ञातांकडून गोळीबार; 3 ठार

जेरुसलेम : इस्त्राईलच्या मध्य भागातील असलेल्या एलाद या शहरात गुरूवारी दोन अज्ञातांनी हल्ला केला आहे. त्या हल्ल्यात दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असून चार लोकं जखमी झाले आहेत. दरम्यान बुधवारी इस्त्राईलचा स्वातंत्र्य दिवस होता आणि गुरूवारी हा हल्ला झाल्याने निषेध व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा: राज ठाकरेंवर गुन्हा; वसंत मोरे तिरुपती बालाजीला रवाना

दरवर्षी ४ मे रोजी (बुधवारी) इस्त्राईल या देशात स्वातंत्र्यदिवस साजरा केला जातो. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा हल्ला झाल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सांगितलं जातंय की, कुऱ्हाडी आणि बंदुका असलेले दोन हल्लेखोर एका स्थानिक पार्कमध्ये घुसले आणि त्यांनी गोळीबार सुरू केला. ज्याच्या हातात कुऱ्हाडी होत्या त्याने लोकांवर वार करायला सुरूवात केली. या हल्ल्यात तीन लोकांचा मृत्यू झाला असून चार जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोन जणांची स्थिती गंभीर असल्याची माहिती आहे.

हेही वाचा: Share Market: शेअर बाजार कोसळला; निफ्टी-50 मधील सर्व शेअर्समध्ये घसरण

दरम्यान हा हल्ला सुरू असताना पोलिसांच्या प्रतिहल्ल्यात एका हल्लेखोराचा मृत्यू झाला असून एकजण फरार झाला आहे. पोलिस त्याच्या शोधात असून पोलिसांनी स्थानिक नागरिकांना घरात राहण्याचे आदेश दिले आहेत. कारमधून फरार झालेल्या आरोपीचा शोध सुरू असून शहरातील विविध भागात नाकाबंदी करून तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याबरोबरच हेलिकॉप्टरच्या माध्यमातूनही आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

अमेरिकन परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राईस यांनीही या हल्ल्याचा निषेध करत दहशतवादी हल्ल्यासारखा हा हल्ला असल्याचं सांगितलं होतं.

Web Title: Israel Unknown Attack Fire 3 Death 4 Injured

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top