जंगलराजवाल्यांचा भारतमातेस विरोध

वृत्तसंस्था
Wednesday, 4 November 2020

बिहारमधील शूरवीर देशाच्या संरक्षणासाठी बलिदान देतात पण बिहारला जंगलराज बनविणारे आणि त्यांचे सहकारी मात्र भारत मातेच्या जयजयकाराला विरोध करत आहेत. भारत माता की जय बोलताच या लोकांना ताप येऊ लागतो. आता हीच मंडळी जय श्रीरामच्या नावाने नारेबाजी करण्यास देखील विरोध करत आहे.

पाटणा - बिहारमधील शूरवीर देशाच्या संरक्षणासाठी बलिदान देतात पण बिहारला जंगलराज बनविणारे आणि त्यांचे सहकारी मात्र भारत मातेच्या जयजयकाराला विरोध करत आहेत. भारत माता की जय बोलताच या लोकांना ताप येऊ लागतो. आता हीच मंडळी जय श्रीरामच्या नावाने नारेबाजी करण्यास देखील विरोध करत आहे. बिहारच्या निवडणुकीत माता भारतीचा जयजयकार करणे या लोकांना आवडत नाही, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पंतप्रधानांच्या बिहार दौऱ्याचा हा चौथा दिवस होता. सहरसामध्ये आयोजित सभेत बोलताना त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. जंगलराज आणणाऱ्या मंडळींनी आता भारत मातेच्या जयघोषाला आक्षेप घेतला आहे. एक टोळी घोषणाबाजी करत असताना दुसऱ्या टोळीचे डोके दुखू लागते. भारतमातेला यांचा आक्षेप असेल तर येथील जनतेचा देखील त्यांना विरोध आहे, असे मोदी यांनी स्पष्ट केले.

Bihar Election- बिहारमध्ये सायंकाळी पाचपर्यंत 51 टक्के मतदान

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले

  • बिहारच्या युवराजांना जनतेने नाकारले 
  • स्थानिक लोकांचाच जंगलराजला तीव्र विरोध
  • बिहारमध्ये परिवारवाद पराभूत होऊ लागला
  • नितीश यांनी जंगलराजचा प्रभाव कमी केला
  • आता नवी भरारी घेण्याची हीच योग्य वेळ
  • लोकांना भीती घालणाऱ्यांना बिहारने ओळखले
  • काँग्रेसला त्यांच्या चुकांची शिक्षा मिळते

मशिदीत घुसून हनुमान चालीसा पठण; फेसबुक लाइव्हसुद्धा केलं

राबडीदेवींकडून गुजरातचा उल्लेख
पंतप्रधान मोदींच्या प्रचारावर भाष्य करताना माजी मुख्यमंत्री राबडीदेवी म्हणाल्या,  की  येथे त्यांना गुजरातमधील दंगल आठवत असेल. ते आता बदलाची भाषा बोलू लागले आहेत. आम्ही देखील त्यांना बदलासाठी मतदान करा, असे आवाहन करत आहोत. दरम्यान, राबडीदेवींनी गुजरातमधील दंगलीचा उल्लेख केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: narendra modi speech for bihar vidhansabha election