पोलिओ लसीकरण मोहिम लांबणीवर

पीटीआय
Thursday, 14 January 2021

देशभरात कोरोना लसीकरणाचे पडघम वाजत असतानाच राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिम मात्र पुढे ढकलण्यात आली आहे. आकस्मिक कारणांमुळे पुढील सूचनेपर्यंत ही मोहिम पुढे ढकलल्याचे केंद्राने स्पष्ट केले. 

नवी दिल्ली - देशभरात कोरोना लसीकरणाचे पडघम वाजत असतानाच राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिम मात्र पुढे ढकलण्यात आली आहे. आकस्मिक कारणांमुळे पुढील सूचनेपर्यंत ही मोहिम पुढे ढकलल्याचे केंद्राने स्पष्ट केले. 

येत्या १७  जानेवारीला राष्ट्रीय पोलिओ लसीकरण दिन होता.  या मोहिमेतंर्गत पाच  वर्षांपर्यंतच्या मुलांना पोलिओची लस दिली जाते. मात्र, आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांच्या आरोग्य सचिवांना यासंदर्भात नऊ जानेवारीला पत्र पाठविले आहे. काही आकस्मिक कारणांमुळे नियोजित पोलिओ मोहिम पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे, असे या पत्रात म्हटले आहे.

हे वाचा - 350 आरोपी, 900 साक्षीदार; इटलीतल्या खटल्याकडं संपूर्ण जगाचं लक्ष

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी नुकतीच १७ जानेवारीला पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्याचे जाहीर केले होते. दोनतीन दिवस चालणाऱ्या या मोहिमेत लसीकरणापासून वंचित राहणाऱ्या मुलांना शोधून लस देण्याची घोषणाही त्यांनी केली होती.

हे वाचा -मुंडेच्या राजीनाम्याची मागणी ते कर्नाटकातला भ्रष्ट कारभार; देशविदेशातील घडामोडी एका क्लिकवर

कोरोना लसीकरणाचा अडथळा?
देशभरात कोरोना लसीकरणाला १६ जानेवारीपासून सुरवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील लसीकरणाची सर्वांत मोठी मोहिम असा उल्लेख केलेल्या या मोहिमेत पोलिओ लसीकरण मोहिमेचा अडथळा ठरण्याची शक्यता होती. त्यामुळे, पोलिओ लसीकरण पुढे ढकलल्याची शक्यता आहे.  

हे वाचा - चिंता नको, Whatsappचा डेटा सर्वरमधून डिलिट करता येतो; जाणून घ्या प्रोसेस


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: national polio vaccination campaign has been postponed

Tags
टॉपिकस
Topic Tags: