गोळीबारात मरण पावलेल्या नवीनच्या कुटुंबीयांचा मोठा निर्णय

Russia-Ukraine War
Russia-Ukraine Waresakal
Summary

'युक्रेनमधून मुलाचा मृतदेह परत आणण्याच्या प्रक्रियेत झालेल्या विलंबामुळं आपण खूप दु:खी आहोत; पण..'

बंगळुरु : युक्रेनच्या खार्किव्ह (Russia-Ukraine War) शहरात झालेल्या गोळीबारात कर्नाटकातील (Karnataka) रहिवासी असलेल्या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. रशियन हल्ल्यानंतर युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात भारतीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना होती. दरम्यान, गोळीबारात प्राण गमावलेला नवीन शेखरप्पा ग्यानगौदार (Naveen Shekharappa Gyanagoudar) याचं पार्थिव सोमवारी भारतात पोहोचणार आहे. त्याच्याआधीच नवीनच्या कुटुंबीयांनी एक मोठा निर्णय घेतलाय. नवीनच्या अंत्यसंस्कारानंतर अवयवदान अंतर्गत आपल्या मुलाचा मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयात देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.

नवीनचा मृतदेह 21 मार्चला दुपारी 3 वाजता बंगळुरूला पोहोचेल, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Karnataka Chief Minister Basavaraj Bommai) यांनी सांगितलंय. कर्नाटकमधील हावेरी जिल्ह्यातील चालगेरी इथं राहणारा 22 वर्षीय नवीन खार्किव्ह (Kharkiv City) येथील एका बंकरमध्ये होता. तो 1 मार्च रोजी बंकरमधून खाण्या-पिण्यासाठी बाहेर पडला असता, गोळीबारामुळं त्याचा मृत्यू झाला होता.

Russia-Ukraine War
होळीच्या धामधुमीत जोरदार हाणामारी; 4 ठार, 6 जण जखमी

नवीनचे वडील शेखरप्पा (Shekharappa Gyanagoudar) यांनी सांगितलं की, युक्रेनमधून आपल्या मुलाचा मृतदेह परत आणण्याच्या प्रक्रियेत झालेल्या विलंबामुळं आपण खूप दु:खी आहोत; पण आता माझ्या मुलाचं पार्थिव शेवटचं पाहू शकणार आहे, त्यामुळं आपलं दु:ख संपलं असल्याचं त्यांनी सांगितलंय. सोमवारी मृतदेह चालगेरी गावात पोहोचणार असल्याचंही ते म्हणाले. नवीनचं अंत्यसंस्कार केल्यानंतर कुटुंबानं दावणगिरीतील एसएस मेडिकल कॉलेजमध्ये (SS Medical College Davangere) मृतदेह दान करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळं वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासासाठी मदत होणार असल्याचंही शेखरप्पा म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com