सिद्धू अजूनही दबावाचे राजकारण करण्यात मग्न; आणताहेत दबाव

Navjot Singh Sidhu
Navjot Singh SidhuNavjot Singh Sidhu

स्वतःची जागा गमावल्याने नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांची विश्वासार्हता कमकुवत झाली असेल, पण त्यांची वृत्ती अबाधित आहे. त्यांनी पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्षपदासाठी हायकमांडकडे मागणी केल्याचे बोलले जात आहे. सिद्धू यांनी नुकतीच पंजाबमधील २४ नेत्यांची बैठक घेतली होती. निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांसह आमदार सुखपाल खैरा आणि बलविंदर धालीवाल यांनीही यात सहभाग घेतला होता.

पंजाब विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सोनिया गांधी यांनी प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. सोनिया गांधी यांच्या इच्छेनुसार मी राजीनामा देत आहे, असे एका ओळीत लिहून सिद्धू यांनी राजीनामा दिला होता. सिद्धू कॅम्पचे म्हणणे आहे की, चरणजीत चन्नी यांना मुख्यमंत्री चेहरा बनवताना राहुल गांधींनी स्पष्ट केले होते की, पराभव किंवा विजयासाठी सिद्धू जबाबदार नसतील. त्यामुळे त्यांना पदावरून हटवणे योग्य होणार नाही.

Navjot Singh Sidhu
मुलीवर बलात्कार करणाऱ्याचे वडिलांनी केले तुकडे; नदीत फेकले

सध्या पंजाबच्या नवीन प्रदेशाध्यक्षांसाठी राज्य समितीने पाठवलेल्या नावांमध्ये खासदार रवनीत बिट्टू आणि चौधरी संतोख सिंग यांचा समावेश आहे. दुसरीकडे, गिद्दरबाहाचे आमदार अमरिंदर राजा वडिंग आणि सुखजिंदर रंधवा हेही शर्यतीत आहेत. मात्र, नवज्योत सिद्धू (Navjot Singh Sidhu) दुसऱ्यांदा प्रमुखपदासाठी इच्छुक (Pressure to become president) आहेत. यापूर्वीही त्यांनी सुमारे दोन डझन काँग्रेस (congress) नेत्यांना भेटून ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला होता. जाबच्या राजकारणात परतलेले आमदार प्रताप सिंह बाजवा यांनीही हावभावात दावा केला आहे.

गटबाजी सर्वांत मोठे टेन्शन

पंजाबमधील काँग्रेससाठी (congress) सर्वांत मोठे टेन्शन म्हणजे गटबाजी थांबवणे. चरणजीत सिंग चन्नी, सिद्धू आणि बाजवा मिळून तीन कोन तयार करतात. याशिवाय मनीष तिवारीही अनेकदा वेगळ्याच टोनमध्ये राहतो. अशा स्थितीत अशा नेत्यांकडे कमान द्यायची, ज्याच्या छत्रछायेत पक्षाने एकोप्याने काम करावे, ही पक्षाची चिंता आहे. दोन वर्षांनंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पराभव होऊ नये यासाठी काँग्रेसचा प्रयत्न आहे, त्यामुळे काँग्रेस खासदारांवर लक्ष केंद्रित करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com