द्रौपदी मुर्मू यांनी झाडू घेत केली मंदिरात स्वच्छता; व्हिडिओ व्हायरल

त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Droupadi Murmu
Droupadi Murmuसकाळ

ओडिशात, एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी रायरंगपूरमधील शिव मंदिर झाडूने स्वच्छ केले आणि नंतर प्रार्थना केली.त्यांच्या या कृतीमुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्यांचा शिव मंदीरात झाडू मारण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावर अनेक नेटकरीसह नेतेमंडळीडी प्रतिक्रिया देत आहेत. (NDA's presidential candidate Droupadi Murmu has sweeped temple floor in Odisha video goes iral)

द्रौपदी मुर्मूला आजपासून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) जवानांनी 24 तास झेड प्लस (Z+) श्रेणीची सुरक्षा प्रदान केली आहे.

Droupadi Murmu
भाजपच्या डावात फसले अरविंद केजरीवाल? मुर्मूपासून पाठ फिरवणे का अवघड!

हा व्हिडीओ नेत्याचा साधेपणा आणि नम्रता दर्शवते. राष्ट्रपतीपदासाठी त्यांच्यापेक्षा चांगला उमेदवार कोणीच असू शकत नाही. ओडिशा आणि देशातील आदिवासी समुदायासाठी हा अभिमानाचा क्षण आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष समीर मोहंती यांनी दिली

ओडिशातील पाटबंधारे आणि उर्जा विभागातील कनिष्ठ सहाय्यकापासून ते भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून निवड होण्यापर्यंत या आदिवासी नेत्या द्रौपदी मुर्मू यांचा प्रवास अतिशय कठीण राहलाय. जर द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती पदासाठी निवडून आल्यास मुर्मू या आदिवासी समाजातील भारताच्या पहिल्या राष्ट्रपती असतील.

Droupadi Murmu
'तयार राहा...'; भाजपा हायकमांडच्या सगळ्या आमदारांना सूचना

भाजपची संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर मंगळवारी पक्षाचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली. संथाल समाजात जन्मलेल्या मुर्मू यांनी 1997 मध्ये रायरंगपूर नगर पंचायतीमध्ये नगरसेवक म्हणून राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली होती आणि त्यानंतर 2000 मध्ये ओडिशा सरकारमध्ये त्या मंत्री बनल्या.

त्यांनी 2015 मध्ये झारखंडच्या राज्यपालपदाची जबाबदारीही स्वीकारली. मुर्मू रायरंगपूरच्या दोन वेळा आमदार राहिल्या आहेत.यांशिवाय झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल होण्याचा मानही त्यांना मिळाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com