esakal | "हेरगिरीचा दावा केलाच नाही"; अ‍ॅमनेस्टी इंटरनॅशनलचा युटर्न!
sakal

बोलून बातमी शोधा

"हेरगिरीचा दावा केलाच नाही"; अ‍ॅमनेस्टी इंटरनॅशनलचा युटर्न!

"हेरगिरीचा दावा केलाच नाही"; अ‍ॅमनेस्टी इंटरनॅशनलचा युटर्न!

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : 'द गार्डियन' आणि 'वॉशिंग्टन पोस्ट'सहित १६ माध्यम संस्थांच्या संयुक्त चौकशीत पेगॅसस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हेरगिरी करण्यात आल्याचा दावा अॅमनेस्टी इंटरनॅशनलने केला होता. त्यावरुन भारतात चांगलाच राजकीय गोंधळ माजला आहे. पण, आता अॅमनेस्टी इंटरनॅशनलने आपल्या या दाव्यावरुन युटर्न घेतला आहे. लीक झालेल्या फोन नंबर्सची यादी आणि पेगॅसस स्पायवेअरचा संबंध असल्याचा दावा आपण केला नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. (never claimed leaked phone numbers link NSO Pegasus Spyware list Amnesty aau85)

हेही वाचा: पालघरच्या आदिवासी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, जाणून घ्या स्थिती

इस्त्रायली मीडिया रिपोर्टनुसार, "अॅमनेस्टी इंटरनॅशनलने आपल्या दाव्यावरुन माघार घेतली आहे. या कंपनीनं म्हटलंय की, आम्ही कधीही हा दावा केला नाही की, ही यादी एनएसओशी संबंधित होती. अॅमनेस्टी इंटरनॅशनलने कधीही या यादीला एनएसओ पेगॅसस स्पायवेअरची यादी म्हणून सादर केलेलं नाही. जगातील काही माध्यम संस्थांनी असं केलं असेल, असं त्यांनी म्हटलंय."

हेही वाचा: दैनिक भास्करच्या कार्यालयांवर IT चा छापा; संसदेत पडसाद

अॅमनेस्टीनं म्हटलं की, या यादीत त्या लोकांचा समावेश आहे, ज्यांची हेरगिरी करण्यात एनएसओच्या ग्राहकांना रस आहे. ही यादी त्या लोकांची नव्हती ज्यांची हेरगिरी केली गेली. रिपोर्टनुसार, अॅमनेस्टीनं म्हटलं की, ज्या शोध पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांनी आणि ते काम करत असलेल्या माध्यम संस्थांनी सुरुवातीपासूनच स्पष्टपणे सांगितलं आहे की, एनएसओची यादी ग्राहकांच्या हितासाठी आहे. म्हणजेच याचा अर्थ त्या लोकांशी आहे जे एनएसओचे ग्राहक असू शकतात आणि त्यांना हेरगिरी करणं आवडतं.

अॅमनेस्टी इंटरनॅशनलनं केला होता हा दावा

फ्रान्सच्या नॉन प्रॉफिट संस्था असलेल्या फॉरबिडन स्टोरीज आणि अॅमनेस्टी इंटरनॅशनलचा दावा होता की, ते मानवी स्वातंत्र आणि समाजाच्या मदतीसाठी गंभीर धोकादायक गोष्टींचा छडा लावण्याचा प्रयत्न करतात आणि त्याची उत्तरही शोधतात. त्यामुळे त्यांनी पॅगेससच्या स्पायवेअरचं कायदेशीर विश्लेषण केलं आहे.

हेही वाचा: पालघरच्या आदिवासी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, जाणून घ्या स्थिती

अॅमनेस्टी इंटरनॅशनलच्या माहितीनुसार, त्यांच्या सिक्युरिटी लॅबने जगभरातील मानवाधिकार कार्यकर्त्यांचं आणि पत्रकारांच्या अनेक मोबाईल उपकरणांचं गंभीररित्या न्यायवैद्यक विश्लेषण केलं आहे. या शोधामध्ये हे दिसून आलंय की, एनएसओ ग्रुपनं पॅगेसस स्पायवेअरच्या मदतीनं मानवाधिकार कार्यकर्ते आणि पत्रकारांची सातत्याने व्यापक आणि बेकायदा पद्धतीने पाळत ठेवली. फॉरबिडन स्टोरीज आणि अॅमनेस्टी इंटरनॅशनलला एनएसओच्या फोन रेकॉर्डचा पुरावा हाती लागला आहे. हे त्यांनी भारतासहित जगभरातील अनेक मीडिया संघटनांसोबत शेअर केला आहे.

loading image