
देशभरात ऊस उत्पादकांची साखर कारखान्यांकडे १६८८३ कोटी रुपयांची थकबाकी असून महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची मावळत्या गळीत हंगामाची २०३०.३१ कोटी रुपयांची थकबाकी आहे.
नवी दिल्ली - देशभरात ऊस उत्पादकांची साखर कारखान्यांकडे १६८८३ कोटी रुपयांची थकबाकी असून महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची मावळत्या गळीत हंगामाची २०३०.३१ कोटी रुपयांची थकबाकी आहे. उत्तर प्रदेशात ७५५५.०९ कोटी रुपयांची व त्याखालोखाल कर्नाटकमध्ये ३५८५.१८ कोटी रुपयाची थकबाकी आहे.
हे वाचा - Video: पोलिसांनी केलेल्या बेदम धुलाईचा व्हिडीओ झाला व्हायरल; 2 महिन्यांनी केलं सस्पेंड
अन्न व नागरी पुरवठा मंत्री पियुष गोयल यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. मात्र मागील तीन गळीत हंगामांपासून जादा साखर उत्पादन आणि घटलेले दर यामुळे कारखान्यांपुढे आर्थिक अडचण ओढविल्याची पुस्तीही जोडली. उसाची थकबाकी निकाली काढणे ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. २०१७-१८ मध्ये ही थकबाकी ८५१७९ कोटी रुपये, २०१८-१९ मध्ये ८६७२३ कोटी रुपये आणि २०१९-२० मध्ये ७५८४५ कोटी रुपये होती. शेतकऱ्यांची थकबाकी चुकती व्हावी यासाठी सरकारने २०११८-१९ पासून केलेल्या विविध उपाययोजना केल्याचा दावा मंत्री पियुष गोयल यांनी केला. तसेच उसाची दरवाढ, एमएसपी, साखर निर्यातीसाठी दिले जाणारे अनुदान याचीही माहिती दिली. पियुष गोयल यांनी सांगितले, की गेल्या हंगामात ६० लाख टन साखर निर्यातीसाठी प्रतिटन १०४४८ रुपयांचे अनुदान देऊन सरकारने ६२६८ कोटी रुपयांचा भार सोसला.