

Free Trade Pact Between India and New Zealand to Benefit Key Sectors
sakal
नवी दिल्ली: भारत आणि न्यूझीलंडमधील व्यापार आणि गुंतवणूक वाढविण्यासाठी मुक्त व्यापार करारावर आज शिक्कामोर्तब करण्यात आले. भारताचे वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल आणि न्यूझीलंडचे व्यापारमंत्री टॉड मॅकक्ले यांनी राजधानी दिल्लीतील ‘भारत मंडपम’ येथे अवघ्या नऊ महिन्यांच्या कालावधीत पूर्णत्वास गेलेल्या या कराराच्या अधिकृत दस्तावेजावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. भारतीय कुशल कामगारांसाठी न्यूझीलंडने दरवर्षी पाच हजार विशेष व्हिसा देण्याचे मान्य केले आहे. यात माहिती तंत्रज्ञान व्यावसायिक, अभियंते, आरोग्य कर्मचारी, भारतीय व्यावसायिक स्वयंपाकी आणि योग शिक्षकांचा समावेश असेल. हे व्यावसायिक न्यूझीलंडमध्ये तीन वर्षांपर्यंत राहू शकतील.