Corona : गृहमंत्रालयाचे नवे नियम आजपासून जारी; वाचा काय आहेत गाईडलाईन्स

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 December 2020

आज मंगळवार 1 डिसेंबरपासून गृहमंत्रालयाकडून जाहीर केलेले नवे नियम लागू होणार आहेत.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या प्रसाराला रोखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून परिस्थितीचे आकलन करुन नियम जाहीर केले जातात. आज मंगळवार 1 डिसेंबरपासून गृहमंत्रालयाकडून जाहीर केलेले नवे नियम लागू होणार आहेत. प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थिती लक्षात घेऊन गृहमंत्रालयाने राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना काही प्रतिबंध लागू करण्याच्या सुचना दिल्या आहेत. मात्र, संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय केंद्राशी सल्लामसलत केल्याशिवाय न घेण्याच्या सुचना जारी करण्यात आल्या आहेत. तसेच राज्ये आपल्या सीमा बंद करु शकत नाहीत, असंही गृहमंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलंय. स्थानिक पोलिस आणि प्रशासन हे गृहमंत्रालयाने जारी केलेल्या सुचनांची अंमलबजावणी करण्यास बांधिल असणार आहे. 

हेही वाचा - लशीच्या बाबतीत भारत ‘आत्मनिर्भर’​
गृहमंत्रालयाने जाहीर केलेली ही आहे नवी नियमावली-

 • आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुक सुरु आहे.
 • निम्म्या क्षमतेने सिनेमा थिएटर्स सुरु असणार आहेत.
 • फक्त खेळाडूंच्या प्रशिक्षणाकरता स्विमिंग पूल्स सुरु राहतील.
 • फक्त बिझनेस टू बिझनेट हेतूसाठी प्रदर्शने सुरु राहतील. 
 • सामाजिक, धार्मिक, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक कारणांसाठीचे जमणे हे हॉलच्या फक्त 50 टक्के क्षमतेने राहिल.
 • त्यातही 200 हून अधिक लोक चालणार नाहीत.
 • राज्याअंतर्गत तसेच आंतरराज्यीय वाहतुकीवर कसलीही बंधने नाहीत. 
 • 65 वर्षे वयाच्या वरील वयस्कर लोक, आजारी लोक, गर्भवती महिला, तसेच 10 वर्षांखालील मुले यांना अत्यंत गरजेच्या वेळी अथवा वैद्यकीय कारणांसाठीच बाहेर पडण्याची परवानगी आहे.
 • तसेच आरोग्य सेतू ऍपचा वापर अनिवार्य असणार आहे.

हेही वाचा - राजधानी गारठली; ७१ वर्षांतील निचांक

महाराष्ट्रातील प्रवासाविषयीचे नवे नियम

 • दिल्ली-NCR, राजस्थान, गुजरात आणि गोवा या चार राज्यांतून महाराष्ट्रात येऊ पाहणाऱ्या लोकांना RT-PCR COVID टेस्ट अनिवार्य असणार आहे.
 • तसेच दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा येथून विमानाने प्रवास करणारे सर्व स्थानिक प्रवासी RT-PCR COVID टेस्टचा निगेटीव्ह रिपोर्ट विमानतळावर येताना सादर करणे, अनिवार्य असेल.
 • ही टेस्ट महाराष्ट्रात येण्याआधीच्या 72 तासांपूर्वीची असेल तरच ग्राह्य धरली जाईल. हाच नियम रेल्वे प्रवासालाही लागू राहिल. 

पंजाबमध्ये रात्री कर्फ्यू

 • पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळाघालण्यासाठी राज्यात नवे नियम लागू केले आहेत. आजपासून रात्री कर्फ्यू असणार आहे. रात्री 10 ते सकाळी 5 वाजेपर्यंत हा कर्फ्यू संपूर्ण राज्यात चालणार आहे.
 • पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी नियमांचे उल्लंघनानंतरचा दंड दुप्पट केला आहे. जसे की मास्कचा वापर न केल्यास तसेच सोशल डिस्टंन्सिंगचे पालन न केल्यास 1000 रुपयांचा दंड होऊ शकतो. 
   

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New MHA Covid19 guidelines come into effect today 1 December know what are the new guidelines