राजधानी गारठली; ७१ वर्षांतील निचांक

Delhi
Delhi

नवी दिल्ली - प्रदूषणामुळे राजधानी दिल्लीचा श्‍वास घुसमटला असताना कडाक्याच्या थंडीनेही राजधानीला गारठून टाकले आहे. सरता नोव्हेंबर महिना मागील ७१ वर्षांतील सर्वांत थंड महिना होता. या काळामध्ये किमान तापमान १०.२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते, अशी माहिती हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. येत्या काही दिवसांमध्ये मध्य भारतात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता असून बिहारला याचा मोठा फटका बसू शकतो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याआधी १९४९ मध्ये दिल्लीतील किमान तापमान १०.२ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले होते. त्याहीआधी १९३८ मध्ये नोव्हेंबर महिन्यातील किमान तापमान हे ९.६ अंश सेल्सिअस एवढे होते, त्यानंतर १९३१ मध्ये नऊ अं.से आणि १९३० मध्ये ८.९ अं.से एवढ्या तापमानाची नोंद झाली होती. राजधानीच्या परिसरामध्ये ३, २०, २३ आणि २४ नोव्हेंबर रोजी थंडीची तीव्र लाट अनुभवायला मिळाली अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली.

राजस्थानात तीव्र थंडी
जयपूर - राजस्थानातील माउंट अबू येथे रात्री २.० अं.से एवढ्या नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे.  चुरू येथील पारा ५.५ अं.से, सिकर येथे ६.०, पिलानी येथे ७.१, भिलवाडा ८.०, एरान रोड ८.८, श्रीगंगानगर ९.१ आणि अजमेर येथे ९.८ अं.से तापमानाची नोंद झाली. येत्या काही दिवसांमध्ये राजस्थानातील तापमानामध्ये आणखी घट होण्याची शक्यता आहे.

येथे तीव्रता वाढणार
पंजाब, हरियाना, राजस्थान, यूपी, बिहार, झारखंड, छत्तीसगड, प.बंगाल, ओडिशा आणि ईशान्येकडील राज्यांत थंडीची तीव्रता आणखी वाढणार आहे. राजस्थानमध्ये थंडीचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे.

कडाक्याची थंडी

  • शिमल्यात हिमवृष्टीला सुरवात
  • कोरोनामुळे पर्यटकांची पर्यटनाकडे पाठ
  • बिहारमध्ये थंडीची लाट तीव्र होणार
  • मध्य भारतात तीन महिने कडाक्याची थंडी
  • गुलमर्ग श्रीनगरमधील पारा शून्यावर

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com