लष्कर भरतीबाबत नवीन नियमावली जाहीर होणार?

New regulations regarding army recruitment will be announced
New regulations regarding army recruitment will be announcedNew regulations regarding army recruitment will be announced

नवी दिल्ली : लष्करातील भरतीबाबत नवीन नियम (regulations) जाहीर होऊ शकतात. त्यासाठी तिन्ही लष्करप्रमुख बुधवारी (ता. ८) संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. तिन्ही लष्करप्रमुख चीफ ऑफ टूर ऑफ ड्युटीसंदर्भात काही महत्त्वाच्या घोषणा करतील अशी अपेक्षा आहे. बहुधा ही पद्धत पहिल्यांदाच केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. (New regulations regarding army recruitment will be announced)

याअंतर्गत ४० ते ५० हजार सैनिकांची भरती (army recruitment) करण्यात येणार आहे. त्यांच्याकडे सुमारे साडेतीन ते चार वर्षांची नोकरी असेल. चार वर्षांच्या सेवेनंतर ७५ टक्के लोक निघून जातील. भविष्यात केवळ २५ टक्के लोकच सैन्यात भरती होऊ शकतील. तिन्ही लष्करप्रमुख उद्या लष्करात नव्या सुधारणांचा रोडमॅप मांडू शकतात.

New regulations regarding army recruitment will be announced
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी बुधवारी ईडीसमोर हजर राहणार नाही!

लष्करातील वय प्रोफाइलही कमी होण्याचा अंदाज आहे. पगारही कमी असू शकतो. त्यांना पेन्शन मिळणार नाही. दरवर्षी ६०,००० लोक निवृत्त होतात. कोरोनामुळे सुमारे अडीच वर्षांपासून सैन्यात शिपाई भरती झालेली नाही, हे विशेष...

नरेंद्र मोदी सरकारने चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) पदावरील नियुक्तीच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. CDS पदासाठी पात्र अधिकाऱ्यांची व्याप्ती वाढवत संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ज्याअंतर्गत नौदल आणि हवाई दलात सेवा करणारे लेफ्टनंट जनरल किंवा त्यांच्या समकक्ष देखील CDS बनू शकतात. मार्गदर्शक तत्त्वे तिन्ही सेवांमधील दुसऱ्या क्रमांकाच्या सक्रिय रँकच्या अधिकाऱ्यांना लष्करप्रमुख, हवाई दल प्रमुख आणि नौदल प्रमुख यासारख्या वरिष्ठांचे सुपरसीडिंग करून CDS होण्याचा मार्ग मोकळा करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com