Nipani Constituency : 'काकासाहेबांनी अनेकांना मोठं केलं, पण त्यांनीच शेवटी धोका दिला'

काँग्रेस पक्षाशी (Congress Party) एकनिष्ठ राहून काम करणाऱ्या काकासाहेब पाटील यांची विधान परिषदेवर वर्णी लावावी.
Congress Former MLA Kakasaheb Patil
Congress Former MLA Kakasaheb Patilesakal
Summary

निपाणी मतदारसंघात काँग्रेस पक्ष टिकवून ठेवण्यासाठी काकासाहेब पाटील यांना पद देणं आवश्यक आहे.

निपाणी : गेल्या ४० वर्षांपासून काँग्रेस पक्षाशी (Congress Party) एकनिष्ठ राहून काम करणाऱ्या काकासाहेब पाटील यांची विधान परिषदेवर वर्णी लावावी, अशी मागणी निपाणी मतदारसंघातील (Nipani Constituency) काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली. सोमवारी (ता. १५) येथील शासकीय विश्रामधामात आयोजित बैठकीत कार्यकर्त्यांनी आपली मतं व्यक्त केली.

'काकासाहेब पाटील (Kakasaheb Patil) निवडणुकीसाठी इच्छुक नसतानाही कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव निवडणूक लढवली. शिवाय, निवडणूक कार्यकर्त्यांनीच हातात घेतली होती. त्यामुळं त्यांचा पराजय झालेला नाही. त्यांना मिळालेली मतं ही निर्णायक आहेत.'

Congress Former MLA Kakasaheb Patil
Nipani Election : शरद पवारांच्या उमेदवारानं दाखवली खिलाडूवृत्ती; पराभवानंतर उत्तम पाटलांनी केलं जोल्लेंचं..

अनेकांना काकासाहेबांनी मोठं केलं असून त्यांनीच धोका दिला आहे. त्यांना मतदार चांगलाच धडा शिकवणार आहेत. निपाणी मतदारसंघात काँग्रेस पक्ष टिकवून ठेवण्यासाठी काकासाहेब पाटील यांना पद देणं आवश्यक आहे. धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचा पराभव झाला आहे. हा कौल कार्यकर्त्यांनी स्वीकारला असून या पुढील काळात मतदारसंघात काँग्रेस वाढीसाठी सर्वांचेच प्रयत्न होणार आहेत. मतांचं विभाजन झाल्यामुळंच काँग्रेसचा झाला, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Congress Former MLA Kakasaheb Patil
Gautami Patil : सबसे कातील गौतमी पाटील उदयनराजेंच्या जलमंदिरवर; राजेंना भेट दिली त्यांची आवडती वस्तू

यावेळी झालेल्या चर्चेत निपाणी भाग काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, निकु पाटील, माजी नगराध्यक्ष गजेंद्र पोळ, नवनाथ चव्हाण, जरारखान पठाण, रियाज बागवान, सचिन लोकरे, विनोद साळुंखे, अशोक लाखे, अस्लम शिकलगार, बाळासाहेब कमते, किरण कोकरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

Congress Former MLA Kakasaheb Patil
Karnataka CM : सिद्धरामय्या की DK? मुख्यमंत्रीपदाचा तिढा आज सुटणार, हायकमांडच्या घोषणेकडं लक्ष्य

बैठकीस माजी नगराध्यक्ष विजय शेटके, राजेंद्र चव्हाण, मुन्ना काझी, विश्वास पाटील, युवराज पोळ, सुभाष कांबळे, मुकुंद रावण, अॅड. संजय चव्हाण, अल्लाबक्ष बागवान, प्रशांत नाईक, रामा निकम, संदीप चावरेकर, सागर पाटील, विनोद बल्लारी, इम्रान मुल्ला, कमरुद्दीन मुल्ला, धनाजी निर्मळे, सुनील हिरुगडे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते व माजी नगरसेवक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com