सोनिया गांधींचे वक्तव्य म्हणजे 'मगरीचे अश्रू' : सितारामन

Nirmala Sitharaman criticizes Sonia Gandhi on statement on BJP Government
Nirmala Sitharaman criticizes Sonia Gandhi on statement on BJP Government

नवी दिल्ली : नागरिकत्त्व दुरूस्ती विधेयकावरून देश पेटलेला असताना त्याचे पडसाद राजकीय पटलांवरही दिसून येत आहेत. सत्ताधारी व विरोधी पक्ष एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत. अशातच काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 'ही मोदी सरकारच्या पतनाची सुरवात आहे.' असे वक्तव केले होते. यालाच उत्तर देत अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सोनियांवर कडाडून टीका केली आहे. 

सोनिया गांधींनी जामीया मीलिया आंदोलक विद्यार्थ्यांवर दिलेली प्रतिक्रिया म्हणजे मगरीचे अश्रू आहेत, असे सितारामन म्हणाल्या. मोदी सरकार या सर्व गोष्टी त्यांचे अपयश झाकून जावे यासाठी करत आहेत, अशी टीका सोनिया यांनी केली होती. यावर उत्तर देताना सितारामन म्हणाल्या की, त्यांचे हे वक्तव्य अत्यंत बेजबाबदार आहे. राजकीय फायद्यासाठी त्या असे वक्तव्य करत आहेत. एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून सोनिया यांनी अशा परिस्थितीत शांततेचे आवाहन करणे गरजेचे आहे, त्याऐवजी त्या देशातील जनतेला आणखी भडकवून देत आहेत, असा आरोप सितारामन यांनी केला. 

जामिया मिलिया विद्यापीठात पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ सोनिया गांधींनी निवेदन काढून मोदी सरकारवर हल्ला चढवला होता. "हिंसाचार आणि विभाजनाचे जनक मोदी सरकार असून सरकारमधील मंडळीच हिंसा घडवून आणत आहेत. सरकारचे काम घटनेच्या रक्षणाचे आहे. भाजप सरकारने तर जनतेवरच हल्ला केला आहे. मोदी सरकार हिंसाचार आणि विभाजनाचे जनक बनले आहे. संपूर्ण देशाला विद्वेशाच्या गर्तेत ढकलले आहे. सरकारमध्ये बसलेली मंडळीच घटनेवर आक्रमण आणि तरुणांना मारहाण करत असतील, तर देश कसा चालणार? देशातील विद्यार्थी बेरोजगारी, शुल्कवाढ, घटनेच्या विरोधात भाजपचे षड्‌यंत्र याविरुद्ध रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. परंतु, मोदी सरकारमधील मंत्री देशातील तरुणांना दहशतवादी, नक्षलवादी, फुटीरवादी, देशद्रोही सिद्ध करण्यात व्यग्र आहेत. मोदी सरकार धार्मिक उन्माद, हिंसा वाढवून स्वतःच्या अपयशाकडून लक्ष इतरत्र वळविण्याचा प्रयत्न करीत आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक याच विभाजनवादी धोरणाचा हिस्सा आहे.'' असा आरोप सोनिया यांनी मोदी सरकारवर केला होता. विद्यार्थ्यांबाबतचे त्यांचे हे मत म्हणजे 'मगरमच्छ के आँसू' आहेत, असे सितारामन म्हणल्या. 

विरोधी पक्षाने जबाबदारिने वागण्याऐवजी काँग्रेस देश आणखी कसा पेटेल याकडे लक्ष देत आहे, जे की अत्यंत दुर्दैवी आहे, असेही सितारामन यांनी यावेळी सांगितले.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com