#IndiaGate : प्रियांका गांधी उतरल्या रस्त्यावर; इंडिया गेटसमोर आंदोलन!

वृत्तसंस्था
Monday, 16 December 2019

केंद्र सरकार विद्यार्थी, पत्रकार आणि पुढे येत असलेल्या लोकांचा आवाज दाबत आहे. सरकारला जनतेच्या आवाजाची भीती वाटते. केंद्र सरकार हुकुमशाही करत असल्याचे ट्विट प्रियांका गांधी यांनी केले आहे. 

नवी दिल्ली : दिल्लीमधील जामिया इस्लामिया मुस्लीम विद्यापीठ आणि अलीगढ मुस्लिम विद्यापीठात पोलिसांनी केलेल्या कारवाईचा काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी-वड्रा यांनी निषेध नोंदविला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पोलिसांनी केलेल्या या कारवाईविरोधात प्रियांका गांधींनी इंडिया गेटसमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, गुलाम नबी आझाद, ए. के. अँटोनी यांचीही प्रमुख उपस्थिती होती. 

नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात दिल्लीमधील जामिया इस्लामिया विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले. यावेळी विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर अलीगढ आणि इतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत या कारवाईचा निषेध नोंदविला. याची दखल घेत प्रियांका गांधींनी केंद्र सरकारवर टीका केली आणि ठिय्या आंदोलन पुकारले.  

- भाजपकडून शिवाजी महाराजांच्या नावाला गालबोट

केंद्र सरकार विद्यार्थी, पत्रकार आणि पुढे येत असलेल्या लोकांचा आवाज दाबत आहे. सरकारला जनतेच्या आवाजाची भीती वाटते. केंद्र सरकार हुकुमशाही करत असल्याचे ट्विट प्रियांका गांधी यांनी केले आहे.  

- राहुल-सावरकर-रेप इन इंडिया, काय आहे यामागचे सत्य?

तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात सुरू असलेला हिंसाचार दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. वादविवाद, चर्चा आणि मतभेद हे लोकशाहीचे विविध भाग आहेत. मात्र, सरकारी मालमत्तेचं नुकसान करणं हे नैतिकतेला अनुसरून नाही, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवरून व्यक्त केली आहे. 

- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता म्हणून भाजपने केली 'या' नेत्याची निवड

या कायद्याला अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. तसेच या कायद्यामुळे कोणत्याही धर्माला धक्का लागणार नाही, असे मी आश्वासन देतो. त्यामुळे भारतीयांनी चिंता करू नये, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Priyanka Gandhi sat on dharna at India Gate against police action on Jamia University students