esakal | नीता अंबानी जगातील 'टॉप टेन' प्रभावशाली महिलांच्या यादीत!
sakal

बोलून बातमी शोधा

Neeta_Ambani

जेव्हा जेव्हा मुंबईची मॅच असायची तेव्हा तेव्हा त्यांनी मैदानावर हजेरी लावली होती. फक्त मुंबईच नाही, तर इतर टीमच्या खेळाडूंसोबतही त्या मैदानावर चर्चा करताना दिसतात.

नीता अंबानी जगातील 'टॉप टेन' प्रभावशाली महिलांच्या यादीत!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाच्या मालकीण आणि प्रसिद्ध भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांचा जगातील प्रभावशाली महिलांच्या यादीत समावेश झाला आहे. प्रसिद्ध अमेरिकन टेनिसस्टार सेरेना विल्यम्स आणि जिम्नॅस्टिक सिमोन माईल्स या क्रीडा जगतातील सर्वात प्रभावशाली महिला ठरल्या आहेत. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

स्पोर्ट्स बिझनेस नेटवर्क आणि आय. ए. स्पोर्ट कनेक्ट यांच्यावतीने २०२० या वर्षासाठीच्या इन्फ्लुएन्शिअल वूमन इन स्पोर्ट महिलांची यादी जाहीर केली. या यादीत २५ महिलांची निवड करण्यात आली. नीता अंबानी या क्रिकेट आणि फुटबॉल या क्रीडा प्रकारांशी निगडीत असल्याने त्यांचा टॉप टेन यादीत समावेश झाला आहे.

- Happy Birthday Shreya : पहिल्याच सिनेमासाठी श्रेया ठरली बेस्ट प्लेबॅक सिंगर

नीता अंबानी या मुंबई इंडियन्स या संघाच्या मालकीण आहेत. मुंबईच्या संघाने आतापर्यंत सर्वाधिक चार वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. तसेच त्यांनी फुटबॉल आणि इतर खेळातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंसाठी विशेष योगदान दिले आहे. 

आयपीएलचा पहिला सीझन वगळता इतर सर्व सीझनमध्ये नीता अंबानी यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. जेव्हा जेव्हा मुंबईची मॅच असायची तेव्हा तेव्हा त्यांनी मैदानावर हजेरी लावली होती. फक्त मुंबईच नाही तर इतर टीमच्या खेळाडूंसोबतही त्या मैदानावर चर्चा करताना दिसतात. 

- 'मी मुख्यमंत्री होणार नाही, पण...'; थलायवा रजनीकांत बदलणार तमिळनाडूचं राजकारण!

नीता अंबानी यांच्याबरोबर टेनिसस्टार सेरेना विल्यम्स, नाओमी ओसाका, फॉर्म्युला वनच्या संचालक मंडळातील सदस्य एली नॉर्मन, वुमन्स एनबीएच्या आयुक्त कॅथी एंगेल्बर्ट, फिफाच्या सरचिटणीस सा मौरा, ऑलिम्पिक संघाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेरी कॉमिस, ईसीबीच्या व्यवस्थापकीय संचालक क्लेयर कॉनर या प्रभावशाली महिला ठरल्या आहेत.

- Coronavirus : देशात ५२, तर राज्यात 'या' ठिकाणी आहेत 'कोरोना टेस्ट लॅब'!

तसेच भारतीय टेनिसस्टार सानिया मिर्झा आणि भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राज यांचाही आयए स्पोर्ट कनेक्टच्या मूळ यादीत समावेश करण्यात आला आहे.

loading image