Bihar Election: भोजपुरमध्ये चिराग पासवान वाढवतील नीतीश कुमारांची डोकेदुखी

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 12 October 2020

बिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची उमेदवारी प्रक्रिया 8 ऑक्टोबर रोजी संपली. भोजपूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातून एकूण 138 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

भोजपूर: बिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची उमेदवारी प्रक्रिया 8 ऑक्टोबर रोजी संपली. भोजपूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातून एकूण 138 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. भोजपूर जिल्ह्यात एकूण सात विधानसभा मतदारसंघ आहेत, ज्यामध्ये गेल्या निवडणुकीत पाच विधानसभा मतदारसंघात राजदचे उमेदवार विजयी झाले होते, तर सत्ताधारी दलाच्या उमेदवाराने एक जागा जिंकली होती, तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पुरुष उमेदवाराने एक जागा जिंकली होती.

यावेळी विधानसभा निवडणुकीत भोजपूरमधील जागावाटपमध्ये एनडीएकडून चार जागा भाजप आणि 3 जागा जेडीयू लढवत आहे. महागठबंधनमध्ये भोजपूर जिल्ह्यातील तीन जागा सीपीआयच्या  खात्यात गेल्या आहेत. तर राजद चार जागांवर निवडणूक लढत आहे. भोजपूर जिल्ह्यामध्ये जेडीयूचे उमेदवार अगिआंव विधानसभा मतदारसंघ, जगदीशपूर आणि संदेश विधानसभा निवडणूक लढवत आहेत. भोजपूर जिल्ह्यात महागठबंधनला टक्कर देण्यासाठी चिराग पासवान पुर्ण दमाने उतरतील असे दिसत आहे. 

Video: युवती अडकली वॉशिंग मशिनमध्ये...

भोजपूरमध्ये संदेश विधानसभा मतदार संघ आहे. या मतदार संघातील जातीय समीकरणं पाहिली तर सर्वाधिक 75 हजार यादव मतदार, 60 हजार राजपूत मतदार आणि 20 हजार इतर मतदार आहेत. इथल्या निवडणुकीत नेहमी निर्णायक भूमिका इतर मतदारच बजावतात. पण लोजपाच्या उमेदवार स्वेता सिंह यांच्या मैदानात उतरल्याने थेट राजद आणि लोजपा यांच्यात लढत होईल असं दिसत आहे. मतदारही लोजोपाच्या कल देताना दिसत आहेत.

बिहारमध्ये काँग्रेसने धर्म आणि जातीवर आधारीत राजकारण केले, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजकारणाची दिशा बदलली आणि विविध क्षेत्रांत बरेच काम केले, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले. मोदी है तो मुमकीन है, नितीश है तो प्रदेश आगे बढेगा, अशी घोषणाही त्यांनी दिली.

हेही वाचा- काँग्रेसने खुशबू सुंदर यांना प्रवक्ते पदावरुन हटवले, भाजपत सहभागी होण्याची शक्यता

आगामी विधानसभा निवडणूकीसाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्याची पहिली सार्वजनिक प्रचार सभा रविवारी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात नड्डा म्हणाले की, आरोग्य कल्याण, शेतकरी कल्याण, शिक्षण, कौशल्य विकास अशा क्षेत्रांत मोदी यांनी विकासात्मक बदल घडवून आणले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: niteh kumar chirag paswan will fight in bhojpur district