नाट्यमय थरार! चप्पलवरुन लागला सुगावा अन् उलगडलं 19 खुनांचं रहस्य

nithari case search for a sandal lead to secret of 19 murders exposed noida
nithari case search for a sandal lead to secret of 19 murders exposed noida

सुमारे दीड दशक जुन्या नोएडाच्या बहुचर्चित आणि भयानक निठारी प्रकरणातील 14 व्या खटल्यातील दोषी सुरेंद्र कोली आणि मोनिंदर सिंग पंढेर यांना आज शिक्षा सुनावली. हे प्रकरण बलात्कारानंतर खून झालेल्या मुलीशी संबंधित होतं, या बेपत्ता मुलीमुळे निठारीची ती भयंकर घटना उघडकीस आली. पण या घटनेचा खरा खुलासा झाला तो, राम किशन यांच्यामुळे ज्यांचा अडीच वर्षांचा मुलगा हर्ष याची त्याच सेक्टर-31 च्या कोठी डी-5 मध्ये हत्या झाली होती...

अमर उजालाने दिलेल्या रिपोर्टनुसार, राम किशन यांनी सांगितले की, सुरेंद्र कोलीला 29 डिसेंबर 2006 च्या रात्री ताब्यात घेतल्यानंतर सीबीआयचे पथक 7 मे 2006 रोजी बेपत्ता झालेल्या मुलीशी संबंधित पुरावे शोधत होते. कोली यांच्या सांगण्यावरून डी-5 कोठीच्या बाउंड्री वॉलमध्ये पडलेल्या चप्पल जप्त करायच्या होत्या. त्यासाठी मला उडी मारून आत जाण्यास सांगण्यात आले. तिथे पोहोचल्यावर अनेक चप्पल आणि कपडे पडलेले दिसले. मला संशय आला, पण त्यावेळी मी परत आलो, पण ज्यांची मुले बेपत्ता झाली होती त्यांच्यासोबत रात्री उशिरा पुन्हा तिथे पोहोचलो. आतमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला होता, तो हटवल्यानंतर धक्कादायक सत्य समोर आलं आणि एक एक करून अनेक सांगाडे भेटत गेले.

nithari case search for a sandal lead to secret of 19 murders exposed noida
Nithari Case : सुरेंद्र कोलीला फाशी तर, पंढेरला कारावास

राम किशनने सांगितले की, 1994 पासून मी निठारी येथील पाण्याच्या टाकी परिसरात बांधलेल्या घरात राहत आहे. 23 एप्रिल 2006 रोजी सायंकाळी अचानक घरातील बल्ब विझला. बल्ब घेण्यासाठी बाहेर बाजारात जाण्यापूर्वी त्यांनी मुलगा हर्षला पाहिले आणि तो घरीच होता. दहा मिनिटांनी तो परत आले तेव्हा मुलगा दिसत नव्हता.

आठ महिने त्याचा शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. डी-5 कोठीमध्ये नर सांगाडा सापडल्यानंतर जप्त केलेल्या वस्तू पोलीस ठाण्यात नेण्यात आल्या. तेथे मुलाची रक्ताने माखलेली चप्पल दिसली असे त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, मी स्वतः कापलेली असल्याने मी चप्पल ओळखली आणि त्यावरून त्यांच्या मुलाची ओळख पटली.

nithari case search for a sandal lead to secret of 19 murders exposed noida
देशात पहिल्यांदाच 5G कॉलची IIT मद्रासमध्ये यशस्वी चाचणी, पाहा VIDEO

दीड दशकापूर्वी हर्ष सोडून गेल्याचं दु:ख राम किशन आणि त्याच्या पत्नीला आजही त्रास देतं. मात्र, हर्ष गेल्यानंतर दोन वर्षांनी आदित्यच्या रूपाने घरात नवीन पाहुणा आला, अन् मन हलकं झालं, कारण आदित्यमध्ये त्यांना हर्षचा दिसायचा,कारण त्याचे हावभाव आणि चेहरा हर्ष सारखाच होता. काळ निघून गेला आता आदित्य 14 वर्षांचा झाला आहे.

ती कोठी उध्वस्त झाली

ती कोठी ज्यामध्ये मानवी सांगाडे सापडले ती आता पूर्णपणे उध्वस्त झाली आहे. उंच झाडी आणि तुटलेल्या घरांची दुरवस्था एवढी आहे की तेथून जाणाऱ्यांना ते दिसतही नाही. काही वर्षांपूर्वी पंजाबमधील जालंधर येथील काही लोक ही कोठी पाहण्यासाठी आले होते, मात्र निठारी घटनेतील पीडितांनी त्यांना पळवून लावले. वाहनांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. मात्र, आता निठारी घटनेतील काही पिडीत आता गावात राहत आहेत.

nithari case search for a sandal lead to secret of 19 murders exposed noida
दिल्ली-शिर्डी विमानात तांत्रिक बिघाड, मुंबईत करावं लागलं लँडिंग

काय आहे प्रकरण?

29 डिसेंबर 2006 रोजी नोएडाचे निठारी प्रकरण उघडकीस आले होते, त्यावेळी देशभरात या क्रूर प्रकरणाची चर्चा होती. नोएडातील निठारी गावातील कोठी क्रमांक डी-5 येथून 19 मुले आणि महिलांचे सांगाडे सापडले होते. हे सर्व 40 पॅकेटमध्ये भरून नाल्यात फेकण्यात आले होते. यानंतर पोलिसांनी व्यापारी मनिंदर सिंग पंढेर आणि त्याचा नोकर सुरेंद्र कोली यांना अटक केली. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले.

निकाल काय लागला?

दरम्यान सीबीआय न्यायालयाने या प्रकरणात आज निठारी घटनेतील दोन्ही दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर न्यायालयाने सुरेंद्र कोळीला आयपीसी 364 अन्वये जन्मठेपेची तर आयपीसी 302 अन्वये फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर मनिंदर सिंग पंढेर याला अवैध वाहतूक (प्रतिबंध) कायद्याच्या कलम 5 अंतर्गत 7 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. न्यायालयाने कोळीला 40 हजार आणि पंढेरला चार हजारांचा दंड ठोठावला आहे. सीबीआय कोर्टाचा हा निर्णय निठारी प्रकरणाशी संबंधित 14 व्या प्रकरणात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com