Bihar Politics: 30 वर्षांपूर्वी नितीश कुमार यांचा डाव लालूंना मुख्यमंत्री करुन गेला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bihar Politics

Bihar Politics: 30 वर्षांपूर्वी नितीश कुमार यांचा डाव लालूंना मुख्यमंत्री करुन गेला

बिहारमध्ये राजकीय घडामोडीला वेग आलाय. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय आणि राष्ट्रीय जनता दलाशी हातमिळवणी केलीय. जनता दल युनायटेड (JDU) आणि राष्ट्रीय जनता दल (RJD) यांच्यातील जवळीक काही काळापासून वाढत असल्याचं बोललं जातंय. आज यावर शिक्कामोर्तब झालाय.

आता नितीश कुमार जेडीयूसोबत दिसत असल्याने पुन्हा एकदा नितीश कुमार आणि लालू यादव एकत्र दिसणार आहे. (nitish kumar and lalu yadav friendship bond in bihar politics)

1974 मध्ये नीतीश कुमार आणि लालू यादव एकत्र आले होते

खरं तर नितीश कुमार आणि लालू यादव हे पहिल्यांदा एकत्र येत नाही. यांच्यातील मैत्री विद्यार्थी आंदोलनाच्या दिवसांमध्ये होती. त्यावेळी दोघांना एकमेकांच्या जवळचे समजायचे. असं म्हणतात की 1974 मध्ये संपुर्ण क्रांती दरम्यान दोघेही एकमेकांचे खुप जवळचे मित्र होते. दोघांना जयप्रकाश नारायण (जेपी)यांचे शिष्य समजले जाते.

1985 मध्ये नितिश कुमार विधानसभेत

असं म्हणतात की संपूर्ण क्रांतीच्या काळात नितीश कुमार 24 वर्षाचे होते तर पटना यूनिवर्सिटीचे विद्यार्थी होते. याच वेळी लालू यादव यांच वय 27 वर्षे होते तर ते पटना कॉलेजचे विद्यार्थी होते. दोघांनी आपला राजकीय मार्ग निवडला. असं म्हणतात की 1985 मध्ये लालू यादव आणि नितिश कुमार विधानसभेत पोहचले मात्र दोन वर्षानंतर 1988 मध्ये कर्पूरी ठाकुर यांचे निधन झाले.

नितीश कुमार यांनी केली होती लालू यादव यांची मदत

नितीश कुमार यांनी लालू यादव यांना विरोधी पक्ष नेता बनवण्यासाठी अथक प्रयत्न केले. नितिश कुमार यांना माहिती होतं की जो विरोधी पक्ष नेता असेल तो नंतर बिहारचे सीएम असेल. नितीश यांनी मेहनतीने आमदारांना लालू यादव यांच्या पाठीशी उभे केले. सर्व राजकीय लोकांना हे माहिती होतं की नितिश कुमार नसते तर लालू यादव हे 1990 मध्ये बिहारचे सीएम बनले नसते.

नितीश कुमार आणि लालू यादव यांच्यात राजकीय दुरावा

नंतरच्या काळात नितीश कुमार और लालू यादव यांच्यात राजकीय दुरावा दिसून आला. नितीश कुमार यांनी समता पार्टी आणि जेडीयू च्या बॅनरखाली राजकीय मार्ग निवडला मात्र असं म्हणतात की नितिश कुमार आणि लालू यादव यांच्यातील मैत्री नेहमी कायम राहली. आणि यामुळेच 2013 मध्ये लालू यादव आणि नितीश कुमार पुन्हा एकत्र आले. यानंतर 2015 मध्ये गठबंधन होत सरकार बनली.

‘माझ्या भावासारख्या मित्राचा मुलगा आहे’

लालू यादव आणि नितीश कुमार यांच्यातील मैत्रीची झलक बिहार विधानसभेमध्ये झालेल्या एका प्रकरणातून दिसते. जेव्हा नोव्हेंबर 2020 मध्ये तेजस्वी यादव यांच्या आरोपावर संतापलेल्या नितीश कुमार यांनी म्हटले होते, "आम्ही आतापर्यंत यासाठी शांत होतो कारण तो आमच्या मुलाच्या समान आहे. माझ्या भावासारख्या मित्राचा तो मुलगा आहे. यामुळे मी ऐकून घेत आहे."