Nitish Kumar : नितीशकुमारांना ‘इंडिया’त मोठे पद मिळणार?

नाराजी दूर करण्यासाठी विरोधी पक्षांचा प्रयत्न ; काँग्रेसची गुरुवारी महत्त्वपूर्ण बैठक
Nitish Kumar
Nitish Kumaresakal

नवी दिल्ली : ‘इंडिया’ आघाडीच्या दिल्लीतील बैठकीत मिळालेल्या वागणुकीमुळे नाराज असल्याचा दावा करण्यात आलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. नितीश यांना आघाडीचे संयोजकपद किंवा समकक्ष पद देण्याबद्दल काँग्रेसकडून घटक पक्षातील इतर नेत्यांशी चर्चा करून चाचपणी सुरू केल्याचे समजते.

Nitish Kumar
Parenting Tips : लहान मुलांसोबत फ्लाईटने प्रवास करताना पालकांनी ‘या’ गोष्टींची घ्यावी काळजी

गेल्या १९ डिसेंबरला दिल्लीत झालेल्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव पुढे करावे, असा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अनुमोदन दिले होते. अचानकपणे झालेल्या घडामोडीमुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार नाराज झाले होते. ते त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेलासुद्धा हजर राहिले नव्हते.

Nitish Kumar
Hair Care Tips : तुम्हीही हिवाळ्यात हेअर ड्रायर वापरता का? मग त्याचे फायदे आणि नुकसान जाणून घ्या

यानंतर नितीशकुमार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा करून या घटनाक्रमाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मुळात नितीशकुमार यांनी ‘इंडिया’ आघाडीतील नेत्यांना एकत्रित करण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांनीच ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन त्यांनी ‘इंडिया’ आघाडीत आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या पार्श्वभूमीवर नितीशकुमार यांची नाराजी परवडणारी नसल्याचे लक्षात आल्यानंतर काँग्रेस श्रेष्ठींनी तत्काळ पावले उचलून नितीशकुमार यांना ‘इंडिया’ आघाडीत संयोजक किंवा समकक्ष पद देण्याच्या संदर्भात इतर नेत्यांशी चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले.

Nitish Kumar
Skin Care Tips : स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी घरच्या घरी तयार करा बॉडी स्क्रब, जाणून घ्या पध्दत!

काँग्रेसची गुरुवारी बैठक

विविध राज्यांतील घटकपक्षांशी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप व आगामी भारत न्याय यात्रेच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसचे सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष व सरचिटणीस यांची बैठक येत्या चार जानेवारीला बोलाविली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाच्यासंदर्भात सर्व राज्यांच्या नेत्यांशी काँग्रेस श्रेष्ठींची चर्चा झालेली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय आघाडी समितीनेसुद्धा सर्व राज्यांच्या नेत्यांशी चर्चा करून जागावाटपावर काय भूमिका घ्यावी, याची चर्चा झालेली आहे.

Nitish Kumar
Skin Care Tips : नव्या वर्षात अशा पद्धतीने सेट करा तुमचे स्किनकेअर रूटीन

यामुळे राष्ट्रीय आघाडी समितीच्या अहवालाच्या आधारावर प्रत्येक राज्यांमधील जागावाटपावर प्रदेशाध्यक्षांची नेमकी भूमिका काय आहे, हे जाणून घेतले जाणार आहे. त्याचप्रमाणे येत्या १४ जानेवारीपासून मणिपूर येथून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत न्याय यात्रेची सुरूवात होत आहे. ही यात्रा १४ राज्यांमधून जाणार आहे. यामुळे या राज्यांत या यात्रेच्या संदर्भात पूर्वतयारीसाठीही ही बैठक महत्त्वपूर्ण असल्याचे सांगण्यात आले.

बिहारच्या नेत्यांचा दबाव

बिहारमधील काँग्रेसच्या नेत्यांनीसुद्धा नितीशकुमार यांना नाराज करणे परवडणारे नसून त्यांना ‘इंडिया’ आघाडीत पुरेसा सन्मान देण्यात यावा, अशी मागणी केली आहे. बिहारच्या नेत्यांनी नुकतीच काँग्रेस श्रेष्ठींची दिल्लीत भेट घेऊन बिहारमध्ये नितीशकुमार यांची प्रतिमा चांगली असल्याने त्यांना नाराज करता येणार नसल्याचे स्पष्ट सांगितले. यामुळेही काँग्रेस श्रेष्ठींनी तातडीने पावले उचलल्याचे सांगितले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com