'अयोध्येत राममंदिर होते यामध्ये शंकाच नाही'!

वृत्तसंस्था
Thursday, 3 October 2019

मुस्लिम पक्षकारांनी मात्र या वादग्रस्त वास्तूच्या खाली ईदगाहची भिंत असल्याचा दावा केला होता. 

नवी दिल्ली : अयोध्येतील पाडण्यात आलेल्या बाबरी मशिदीखाली राम मंदिर होते, यात कुठलीच शंका नाही. येथे प्रत्यक्ष उत्खननातून हाती आलेल्या पुराव्यांवरून मंदिराच्या अस्तित्वाबाबतचा अंदाज बांधता येणे सहज शक्‍य आहे, अशी माहिती रामलल्लाची बाजू न्यायालयात मांडणाऱ्या वकिलांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठासमोर गुरुवारी (ता.3) या प्रकरणाची सुनावणी झाली. या वेळी रामलल्लाची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ सी. एस. वैद्यनाथन यांनी मुस्लिम पक्षकारांचे म्हणणे खोडून काढले. दरम्यान मुस्लिम पक्षकारांनी मात्र या वादग्रस्त वास्तूच्या खाली ईदगाहची भिंत असल्याचा दावा केला होता. 

वैद्यनाथन म्हणाले, ''मुस्लिम पक्षकारांनी सुरवातीलाच या ठिकाणी मूळ मशिदीखाली कोणतीही वास्तू नसल्याचा दावा केला होता, आता ते येथे ईदगाहची भिंत असल्याचे सांगत आहेत. येथील मंदिर पाडूनच मशीद उभारण्यात आली होती. मूळ उत्खननामध्ये येथे काही खांबांचे अवशेष आढळून आले असून त्यातून ही बाब स्पष्टपणे दिसून येते.''

या वेळी मुस्लिम पक्षकारांची बाजू मांडणारे विधिज्ञ राजीव धवन यांनी भारतीय पुरातत्व खात्याच्या अहवालाचा संदर्भ देताना या ठिकाणी मंदिर पाडून मशीद उभारल्याचा कोणताही पुरावा दिसत नसल्याचे सांगितले.

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- Vidhan Sabha 2019 : तीन कोटींच्या गाड्या, 22 कोटींचे शेअर्स; उमेदवाराचं वय 29!

- Vidhan Sabha 2019 : शिवसेनेची मोठी खेळी; आव्हाडांच्या विरोधात 'ही' अभिनेत्री रिंगणात

- संजय निरूपम म्हणाले, 'पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा दिवस लांब नाही'!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No doubt that there was a Ram temple in Ayodhya