
दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनातील आंदोलकांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमांवर सरकारने कोणतेही खड्डे किंवा खंदक खोदलेले नव्हते, असा दावा केंद्राने आज राज्यसभेत केला. राकेश टिकैत यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात गर्दी वाढू लागल्यावर आंदोलकांना रोखण्यासाठी गाझीपूरसह इतर सीमांवर दिल्ली पोलिसांनी काटेरी अडथळे उभारले, अणकुचीदार काटेरी खिळे लावले. त्याची दृश्ये वाहिन्यांवरून पोहोचली असतानाच केंद्राने संसदीय पटलावर तसे काही नसल्याचा दावा केला आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
खिळ्यांचा प्रयोग अंगलट आल्यावर ते रातोरात काढूनही घेण्यात आले. त्यानंतर टिकैत यांनी गावाकडील माती आणून खिळे लावलेल्या जागांवर व येथील खंदक म्हणता येतील अशा खड्यांत रोपे लावली व ‘आम्ही काटे नव्हे तर फुले देऊ’ असे सांगितले. या खंदकांवर अडथळे टाकून नंतर त्यांची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली तरी संयुक्त किसान मोर्चाने या प्रकाराचा निवेदनाद्वारे तेव्हाच निषेध केला होता.
गृहराज्यमंत्री म्हणाले...
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.