
यूपीत रस्त्यांवरील धार्मिक कार्यक्रमांना बंदी; CM योगींचा मोठा निर्णय
लखनऊ : धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंगे उतरवल्यानंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, आता यूपीमध्ये रस्त्यांवर कुठलेही धार्मिक करता येणार नाहीत, सरकारी प्रवक्त्यांनी ही माहिती दिली आहे. (No religious events will be allowed on streets UP CM Yogi Adityanath)
"रस्त्यांवर कोणतेही धार्मिक कार्यक्रम घेण्यास कोणतीही परवानगी देऊ नका. अशा प्रकारचे सर्व कार्यक्रम हे संबंधित धार्मिक स्थळांमध्येच व्हायला हेवत, रस्त्यावर नाही," असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री योगी यांनी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रात मनसेच्या गुढी पाडवा सभेत राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांचा विषय काढत ते उतरवले गेले पाहिजेत अन्यथा त्याच्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्यात येईल, अशी गर्जना त्यांनी केली होती. याचे पडसाद देशभरात उमटले होते. भाजपनंही राज ठाकरेंच्या भूमिकेला पूर्ण पाठिंबा देत ही मागणी लावून धरली होती. यानंतर लगेचच उत्तर प्रदेशातून बातमी आली की, तिथल्या योगी सरकारनं हिंदु-मुस्लिमांसह सर्वच धार्मिक स्थळांवरील लाखो अनधिकृत भोंगे उतरवले आहेत.
योगींच्या या भोगे उतरवण्याच्या निर्णयाचं मोठं स्वागत आणि चर्चाही झाली होती. त्यानंतर आता रस्त्यावर धार्मिक कार्यक्रम होता कामा नये अशी भूमिका त्यांनी मांडली असून तसे स्पष्ट निर्देशही संबंधित प्रशासनाला त्यांनी दिले आहेत.