IAS अधिकाऱ्यानं IPS प्रेयसीशी थाटलं ऑफिसमध्येच लग्न!

टीम ई-सकाळ
Monday, 17 February 2020

तृषार सिंगला हे २०१५ बॅचचे पश्चिम बंगाल केडरचे अधिकारी आहेत. तर नवजोत सिम्मी या २०१७ बॅचच्या बिहार केडरच्या आयपीएस अधिकारी आहेत.

लग्न म्हटलं की प्रत्येकाची काही ना काही स्वप्न असतात. आपलं लग्न असंच झालं पाहिजे, यासाठी जीवाचा आटापिटा केला जातो. पण एका अधिकारी जोडप्यानं केलेलं आगळंवेगळं लग्न सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तृषार सिंगला या आयएएस अधिकाऱ्याने नवजोत सिम्मी या आयपीएस अधिकारी असणाऱ्या प्रेयसीशी ऑफिसमध्येच लग्न केलं. या लग्नाची सगळीकडे चर्चा सुरू आहे. खूप व्यस्त वेळापत्रक असल्यामुळे विवाहासाठी त्यांना वेळ काढणं शक्य होत नसल्याने त्यांनी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी ऑफिसमध्येच रजिस्टर पद्धतीने झटपट लग्न उरकून टाकलं.  

- डिव्हिलिअर्सच्या जबऱ्या फॅनने बघा काय केलंय; सोशल मीडियात फोटो होतोय तुफान व्हायरल!

तृषार सिंगला हे २०१५ बॅचचे पश्चिम बंगाल केडरचे अधिकारी आहेत. तर नवजोत सिम्मी या २०१७ बॅचच्या बिहार केडरच्या आयपीएस अधिकारी आहेत. तृषार सध्या उलुबेरियामध्ये एसडीओ म्हणून कार्यरत आहेत. तर नवजोत या पाटण्यामध्ये डीएसपी म्हणून कार्यरत आहेत. लग्नासाठी नवजोत पाटण्याहून बंगालला आल्या होत्या. 

- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! महिला करणार लष्कराचं नेतृत्त्व

तृषार आणि नवजोत हे मूळचे पंजाबचे असून गेल्या काही वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, कोणत्या ना कोणत्या कारणामुळे त्यांच्या लग्नामध्ये अडथळा येत होता. मात्र, बिझी शेड्युलमधून वेळ काढत व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी ते लग्नबेडीत अडकले. गेल्या काही दिवसांपासून तृषार यांना कामकाजातून वेळ मिळत नव्हता. तसेच लग्नासाठी पंजाबला जाणे शक्य नसल्याने त्यांनी ऑफिसमध्येच लग्न करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती तृषार यांच्या ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनी दिली. तसेच एकत्र राहता यावे, यासाठी दोघे केडर बदलण्याचा विचार करत असल्याची माहितीही काहीजणांनी दिली. 

- "कोरेगाव-भीमा प्रकरणाची राज्य सरकार स्वतंत्रपणे चौकशी करणार"

झटपट लग्न उरकल्यामुळे या अधिकारी कपलच्या मित्रमंडळींना लग्नाला येता आलं नाही. त्यामुळे त्यांना लग्नाची पार्टी दिली जाईल. मात्र, ही पार्टी पश्चिम बंगालमध्ये २०२१ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांनंतर दिली जाणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No time for grand wedding IAS weds IPS in Kolkata office on Valentine's day