"कोरेगाव-भीमा प्रकरणाची राज्य सरकार स्वतंत्रपणे चौकशी करणार" 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्र्याच्या बैठकीत आज याबाबत सखोल चर्चा झालेली असून एनआयए च्या कलम दहा नुसार राज्य सरकारला चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. त्यामुळे कोरेगाव-भीमा प्रकरणाची चौकशी केंद्र सरकारने स्वतःच्या ताब्यात घेतली असली तरी राज्य सरकार या प्रकरणी समांतर चौकशी करणार अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.

मोठी बातमी - तब्बल ५९ वर्षानंतर येणार 'हा' योग; यंदाची महाशिवरात्र असणार विशेष...

गृह मंत्री अनिल देशमुख यांना याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या असून लवकरच शरद पवार यांनी मागणी केल्याप्रमाणे राज्य सरकार एसआयटी ची स्थापना करेल आणि कोरेगाव-भीमा प्रकरणी सखोल चौकशी ला सुरुवात करेल असे मलिक यांनी स्पष्ट केले.

मोठी बातमी - मंत्र्यांच्या बैठकीआधी नवाब मलिक यांचं 'मोठं' वक्तव्य, म्हणालेत... 

या प्रकरणात बर्‍याच गोष्टी नव्याने समोर येत असल्याने चौकशीची नितांत गरज आहे. काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने तपासल्या असल्याने अनेकावर अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत राज्य सरकारला स्वतंत्रपणे चौकशी करण्याचे अधिकार अबाधित असल्याने त्याबाबतची चौकशी केली जाईल असे नवाब मलिक यांनी घेतले.

मोठी बातमी - त्याने बिस्कीटच्या आमिषाने तिला घरात नेलं, आणि...

दरम्यान याबाबत बोलताना महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी नसल्याचं देखील नवाब मलिक यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केलंय. 

koregaon bhima case maharashtra state governemnt to form SIT under NIA section 10 nawab malik

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: koregaon bhima case maharashtra state governemnt to form SIT under NIA section 10 nawab malik