कोरोनाविरोधातील लढ्यासाठी 'कॉफी विद कलेक्टर' ; नॉयडाच्या जिल्हाधिकाऱ्यांचा अनोखा उपक्रम

Noida Collector
Noida Collector

उत्तर प्रदेशातील गौतमबुद्धनगर जिल्हा प्रशासनाने कोरोनारुग्णांना मदत करण्यासाठी प्लाझ्मा डोनेशन करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना अधिक उत्साही करण्यासाठी कॉफी विद कलेक्टर नावाचा एक उपक्रम सुरु केला आहे. .

काय आहे उपक्रम?
कलेक्टर सुहास एलवाई यांनी म्हटलं की, कोरोना व्हायरस विरोधातील लढाईसाठी प्लाझ्मा डोनेशनसाठी स्वत:हून पुढाकार घेणाऱ्या लोकांचे आभार माणून त्यांच्यासोबत कॉफी किंवा त्यांच्या आवडीच्या इतर पेयासोबत बातचित करतील. प्रशासनाने प्लाझ्मा डोनर्सच्या मदतीसाठी हा पर्याय अवंलबला आहे. जे ही प्लाझ्मा डोनेट करु इच्छीत आहेत, त्यांना दवाखान्यात जाण्याची गरज नाही. तर त्यांनी फक्त एक फोन करणे अपेक्षित आहे, ज्यानंतर आरोग्या कर्मचारी स्वत: त्यांच्या घरी येतील. 

कशी होते प्रक्रिया?
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की, जे लोक करोना व्हायरसपासून  पूर्णपणे मुक्त झाले आहेत, ते लोक प्लाझ्मा डोनेट करण्यासयोग्य आहेत आणि 7303488239 या नंबरवर फोन करु शकतात. त्यानंतर ग्रेटर नॉयडाच्या Government Institute of Medical Sciences (GIMS) चे  आरोग्य कर्मचारी त्यांच्या घरी येऊन डोनेशनची प्रक्रिया करतील. 

हेही वाचा - 'आम्ही मदत केली तर...', भारत चीन वादात ट्रम्प यांची मध्यस्थीची तयारी
कॉफी विद कलेक्टर या उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी सहा प्लाझ्मा डोनर्ससोबत भेट घेतली, ज्यात दोन डॉक्टरदेखील समाविष्ट होते. यामध्ये त्यांनी त्यांचा कोरोनाविरोधातील लढ्यातील अनुभव जाणून घेतला. त्यांनी सांगितलं की हा उपक्रम जास्तीतजास्त लोकांना प्लाझ्मा डोनेशनसाठी प्रवृत्त करण्यासाठी आहे. मी कोरोना रोगापासून वाचलेल्या सर्वांना आवाहन करतो की त्यांनी प्लाझ्मा डोनेशनसाठी जरूर पुढाकार घ्यावा. 

काय आहे प्लाझ्मा उपचारपद्धती?
convalescent-plasma therapy नावाने ओळखल्या जाणाऱ्या या उपचारपद्धतीमध्ये आजारापासून  बरे झालेल्या व्यक्तींच्या शरिरात तयार झालेल्या प्रतिकार शक्तीचा उपयोग त्याच रोगामुळे आजारी पडलेल्या व्यक्तीला  बरे करण्यासाठी केला जातो. इंडियन कौंन्सिल फॉर मेडिकल रिसर्चने कोरोनावरील उपचारांसाठी या उपचारपद्धतीला मान्यता दिली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com