थेट अयोध्येतून : आता लक्ष अयोध्येच्या विकासाकडे ! 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 November 2019

रामजन्मभूमी बाबतच्या निकालाचा जल्लोष कमी झाल्यावर सकाळच्या प्रतिनिधीने मुख्य बाजारपेठेत जाऊन व्यापाऱ्यांशी संवाद साधला, तेव्हा अनेक शहरांत नोटबंदी, जीएसटीची अंमलबजावणी यामुळे व्यापार कमी झाल्याची त्यांचीही तक्रार होतीच. तसेच अयोध्या हे टुमदार आणि सुनियोजित शहर म्हणून उदयाला यायला पाहिजे, असे त्यांनाही वाटत असल्याचे त्यांच्याशी बोलताना जाणवले. 

अयोध्या : साधु- संतांच्या वास्तव्यामुळे धर्मनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अयोध्येतील अनेक दशके वादाचा ठरलेला रामजन्मभूमीच्या प्रश्नावर अखेर निकाल जाहीर झाला असला तरी, येथील नागरिकांना आता सर्वांगिण विकासाची ओढ लागली आहे, असे त्यांच्याशी बोलताना शनिवारी सायंकाळी जाणवले. 

बाबरी मशीद जमीनदोस्त होत होती आणि सुरक्षा दल निष्क्रीयपणे पाहत होतं!
रामजन्मभूमी बाबतच्या निकालाचा जल्लोष कमी झाल्यावर सकाळच्या प्रतिनिधीने मुख्य बाजारपेठेत जाऊन व्यापाऱ्यांशी संवाद साधला, तेव्हा अनेक शहरांत नोटबंदी, जीएसटीची अंमलबजावणी यामुळे व्यापार कमी झाल्याची त्यांचीही तक्रार होतीच. तसेच अयोध्या हे टुमदार आणि सुनियोजित शहर म्हणून उदयाला यायला पाहिजे, असे त्यांनाही वाटत असल्याचे त्यांच्याशी बोलताना जाणवले. 

अयोध्या- फ़ैजाबादची लोकसंख्या सुमारे एक ते सव्वा लाख. उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौपासून अवघ्या 150 किलोमीटर अंतरावर असलेल्या या शहरात अरुंद रस्ते, उघडी गटारे, रस्त्यांची दुरवस्था, जागोजागी पडलेला कचरा, सार्वजनिक स्वच्छतागृहांचा नियोजनाचा अभाव या मुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. रामलल्लामुळे पर्यटक, भाविक येतात पण, त्यांचे हाल होतात, याचीही जाणीव या व्यापाऱ्यांना आहे. म्हणूनच त्यांना आता नवे मंदिर होताना शहराचाही चेहरा-मोहरा बदलून जावा, असे वाटते. 

विकासचंद्र गुप्ता (कापड व्यावसायिक) : ''एक प्रश्न मिटला, आता शहराचा विकास व्हायला पाहिजे. बाहेरचे लोक येत येतात, तेव्हा त्यांना चांगले नाही वाटत.'' 
रामानं घडवलेलं राजकीय महाभारत!

राकेशकुमार पांडे (सिमेंट व्यापारी) : ''टेंशन आता कमी होईल, त्यामुळे सरकारला विकासाकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल, असे वाटते. त्याची खूप गरज आहे.'' 

गोमाता ते रामलल्ला!

विश्वासचंद्र गुप्ता (गिफ्ट आर्टिकल व्यावसायिक) : ''गेली 25 - 40 वर्षे अयोध्या नुसतीच गाजत आहे, पण तिच्या सुधारणेचे काय ? लोकल बॉडी नाही तर राज्य सरकारने तरी काही तरी ठोस केले पाहिजे, जगभर नाव होऊनही अयोध्या आहे तशीच आहे.'' 
रामजन्मभूमीचा लढा हा विटा-मातीच्या इमारतीसाठीचा संघर्ष नव्हे!

डॉ. के. आर. अग्रवाल (वैद्यकीय क्षेत्र) : ''राज्यात आणि केंद्रात आता एकाच पक्षाचे सरकार आहे. टेन्शनचाही प्रश्न आता सुटला आहे. त्या मुळे नक्कीच आता अयोध्येची सुधारणा होईल.''
थेट अयोध्येतून : राममंदिरासाठी 65 टक्के कोरीव काम पूर्ण! (Video)रामजन्मभूमीसाठी अशी सुरू झाली कारसेवा!
Ayodhya Verdict : अयोध्यातील घटनाक्रम : 1528-2019 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now development of Ayodhya will start after verdict