दहशतवाद्याकडून डोवाल यांच्या बंगल्याची 'रेकी', व्हिडिओ पाकिस्तानातही पाठवला

NSA, ajit doval, jaish e mohammed,terrorist reveals plan
NSA, ajit doval, jaish e mohammed,terrorist reveals plan

राष्‍ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल पाकिस्तानी दहशतावादी संघटनेच्या निशाण्यावर होते, अशी धक्कादायक माहिती समोर आलीय. जैश-ए-मोहम्‍मद (JeM) दहशतवादी संघटनेच्या अटकेत असलेल्या दहशतवाद्याने यासंदर्भातील कबुली दिली आहे. पाकिस्तानी दहशतवादी संघटनेच्या सूचनेनुसार , अजित डोवाल यांच्या कार्यालयाची रेखी केली होती, असा खुलासा त्याने केलाय. प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, या दहशतवाद्याने केवळ सरदार पटेल भवनच नव्हे तर दिल्लीतील काही प्रमुख ठिकाणाची व्हिडिओ रेकी केली होती.

दहशतवाद्याने चौकशी दरम्यान समोर आलेल्या माहितीनंतर अजित डोवाल यांचे कार्यालय आणि निवासस्थान परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. जैश ए मोहम्मद या पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या व्यक्तीला  6 फेब्रुवारी रोजी दक्षिण काश्मीरमधील शोपियां येथून अटक करण्यात आले होते. चौकशी वेळी त्याने अजित डोवाल यांच्या हालचालींवर नजर ठेवत असल्याची माहिती उघड केली. 

भारतीय तंत्राची मलेशियाला भुरळ! झाडांच्या संरक्षणासाठी वापरणार आपला एक नंबर 'देशी' फॉर्म्युला

व्हॉट्सअ‍ॅपवरुन सेंड केला रेकीचा व्हिडिओ 

2016 मध्ये करण्यात आलेला सर्जिकल स्ट्राईक आणि 2019 मध्ये बालाकोट स्ट्राईक या घटनेपासून डोवाल सातत्याने पाकिस्तानी दहशतवादी संघटनेच्या हिटलिस्टवर आहेत. हिदायत-उल्‍लाह-मलिक नावाच्या दहशतवाद्याच्या विरोधात जम्‍मू येथील गंगयाल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मलिक जैश याच्या फ्रंट ग्रुप असलेल्या 'लश्‍कर-ए-मुस्‍तफा'चा प्रमुख आहे. त्याला ज्यावेळी अटक करण्यात आले त्यावेळी त्याच्याकडे हत्यारे आणि दारुगोळाही जप्त करण्यात आला होता. 

24 मे 2019 रोजी विमानाने तो श्रीनगरहून-दिल्लीला आला. राजधानीत येऊन त्याने NSA कार्यालयाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ त्याने पाकिस्तानी हँडलरच्या व्हॉट्सअ‍ॅपवरुन पाठविला, अशी माहितीही मलिकने दिली  आहे. 

अनेक दहशतवादी कट चरण्यात मलिकचा हात 

डोवाल यांच्या कार्यालयाची आणि अन्य ठिकाणांची रेकी केल्यानंतर मलिक बसने काश्मीरला परतला. 2019 मध्ये सांबा सेक्टर बॉर्डर परिसराची रेकी केल्याची माहितीही त्याने पोलिसांना दिली आहे. यावेळी त्याच्यासोबत पुलवामा हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या समीर अहमद डारही होता. हिंदुस्थान टाइम्‍सच्या वृत्तानुसार,  मलिकने मे  2020 मध्ये शोपियां येथे जम्मू काश्मिर बँकेचे पैसे घेऊन जाणारी कारही लुटली होती.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com