'ओ मित्रो' हे ओमिक्रॉनपेक्षा धोकादायक; याचा सौम्य व्हेरिअंट नाही : थरूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shashi Tharoor
'ओ मित्रो' हे ओमिक्रॉनपेक्षा धोकादायक; याचा सौम्य व्हेरिअंट नाही : थरूर

'ओ मित्रो' हे ओमिक्रॉनपेक्षा धोकादायक; याचा सौम्य व्हेरिअंट नाही : थरूर

आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत असेले काँग्रेस नेते (Congress) शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) टोमणा मारला आहे. केंद्रात भाजपचं सरकार (Central Government) सत्तेत आल्यापासून देशात धार्मिक ध्रुवीकरण आणि द्वेष वाढल्याचा गंभीर करत शशी थरूर यांनी अतिशय मिश्किल पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा: युपीतल्या मतदानाची 'इस्लामाबाद' मध्ये आतुरता; रंजक आहे कारण

हेही वाचा: भाजपने उमेदवारांची नावं जाहीर करताच इच्छुकांचे दिले राजीनामे

नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना शशी थरूर यांनी आपल्या खास शैलीत नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. 'ओमिक्रॉन'पेक्षा जास्त धोकादायक 'ओ मित्रो' असल्याचं शशी थरूर म्हणाले आहेत. वाढलेलं ध्रुवीकरण, द्वेष आणि धर्मांधतेला मिळणारी चालना, संविधानावरील हल्ले आणि आपली लोकशाही कमकुवत झाल्यानंतरचे परिणाम आपण दररोज भोगत आहोत, असं म्हणत त्यांनी या विषाणूचा कोणताही सौम्य व्हेरीअंट नाही असंही म्हटलं आहे.

हेही वाचा: Video: निवडणूक आयोगाची आज महत्वाची बैठक

Web Title: O Mitron Is Dangerous Than Omicron Shahsi Tharoor Criticises Pm Narendra Modi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top