डेल्टा व्हेरियंटपेक्षा ओमिक्रॉनमुळं पुन्हा संसर्गाचा धोका तीनपट अधिक!

जागतीक आरोग्य संघटनेच्या मुख्य डॉक्टरांची माहिती
डेल्टा व्हेरियंटपेक्षा ओमिक्रॉनमुळं पुन्हा संसर्गाचा धोका तीनपट अधिक!
sakal media
Updated on

नवी दिल्ली : ओमिक्रॉन व्हेरियंट हा कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटपेक्षा तीनपट अधिक संसर्गजन्य असून याचा लहान मुलं आणि लसीकरण झालेल्या प्रौढ व्यक्तींनाही धोका आहे, अशी माहिती जागतीक आरोग्य संघटनेच्या (WHO) मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी दिली आहे. CNBC-TV18 या इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

डेल्टा व्हेरियंटपेक्षा ओमिक्रॉनमुळं पुन्हा संसर्गाचा धोका तीनपट अधिक!
कोविड चाचण्यांमध्ये दर कपात; RT-PCR साठी लागणार ३५० रुपये

डॉ. स्वामिनाथन म्हणाल्या, कोविडच्या व्हेरियंट्सचा संसर्ग आणि प्रसाराबाबतचा डेटा येण्यास वेळ लागतो. सध्या वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की, दक्षिण अफ्रिकेत आढळलेला ओमिक्रॉन व्हेरियंट हा वेगानं संसर्ग करणारा व्हेरियंट आहे. ओमिक्रॉनची लागण झाल्यास ९० दिवसांमध्ये याचा पुन्हा संसर्ग होऊ शकतो. म्हणजेच डेल्टा व्हेरियंटपेक्षा ओमिक्रॉन हा तीन पट जास्त संसर्गजन्य आहे. नुकत्याच समोर आलेल्या ओमिक्रॉनच्या संसर्गबाधितांच्या डेटावरुन ही माहिती समोर आली आहे. ज्या देशांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत, यामध्ये लहान मुलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.

अठरा वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणावर भर द्यावा

सर्व देशांनी लसीकरणाच्या डेटाचा अभ्यास करायला हवा. यामध्ये संसर्गबाधितांचं वय आणि ते कुठल्या भागातील आहेत याचा त्यात समावेश असावा. तसेच संसर्गाचं प्रमाण कमी करण्यासाठी १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्यावर भर द्यावा. अमेरिकेतून आलेल्या डेटानुसार लसीकरणामुळं मृत्यूपासून बचाव होऊ शकतो, हे सांगताना जगभरात लस पोहोचवण्यामध्ये असमानता आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.

विविध देशांमध्ये महामारीतील डेटाचं शेअरिंग हवं

जगभरात या महामारीतील जास्तीत जास्त डेटाचं शेअरिंग झालं पाहिजे. जे देश नव्या व्हेरियंटची आणि डेटाची माहिती खुली करत आहेत त्यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे. विविध देशांमध्ये आपल्याला डेटा शेअरिंगबाबत समन्वय साधायला हवा, अशी अपेक्षाही डॉ. स्वामिनाथन यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Why did India waive cotton import duty?
Latest Marathi News Live Update
IMD monsoon delay forecast for India 2026
Mamata Banerjee reaction on Abhishek Banerjee attack
Marathi News Esakal
www.esakal.com