ओमिक्रॉनचे रूग्ण बेपत्ता असणं भारतासाठी चिंताजनक? जाणून घ्या

omicron
omicronesakal

दक्षिण आफ्रिकेतील (south africa) 10 परदेशी नागरिक कर्नाटकातील बेंगळुरू (bangluru) येथे बेपत्ता झाले आहेत. बंगळुरू महानगरपालिका आणि आरोग्य अधिकारी त्यांच्याशी अद्यापही संपर्क साधू शकलेले नाहीत. भारतात (india) पहिला ओमिक्रॉन विषाणूचा (omicron) संसर्ग झालेला रूग्ण आढळल्यानंतर परदेशी प्रवाशांच्या प्रवासाने चिंता वाढवली आहे. मात्र ओमिक्रॉनचे रूग्ण बेपत्ता असणं भारतासाठी कितपत चिंताजनक आहे? याबाबत जाणून घ्या सविस्तर..

13 प्रवासी खोटा पत्ता आणि संपर्क क्रमांक देऊन बेपत्ता

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशमधील मीरूतमध्ये परदेशातून आलेल्या 300 पैकी 13 प्रवासी खोटा पत्ता आणि संपर्क क्रमांक देऊन बेपत्ता झाले आहेत. यातील 7 जण दक्षिण अफ्रिकेतून जाऊन आले आहेत. विमानतळ सुरक्षा, पोलीस आणि आरोग्य विभाग त्यांचा शोध घेत आहेत. चंदीगडमध्ये देखील दक्षिण अफ्रिकेतून येणाऱ्या आणि विलगीकरणाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या एका महिला प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही महिला दक्षिण अफ्रिकेतून आल्यावर नियमांचं उल्लंघन करत लगेचच हॉटेलमध्ये गेली होती.

भारतातील पहिला ओमिक्रॉन रूग्ण बंगळुरूमध्ये

भारतातील पहिला ओमिक्रॉन रूग्ण बंगळुरूमध्ये आढळला. ६६ वर्षीय ही वृद्ध स्त्री दक्षिण अफ्रिकेतून आली होती. तिने कोरोना विरोधी लसीचे दोन्ही डोस घेतलेले होते. या व्यक्तीला घरीच विलगीकरणात राहण्यास सांगितलं होतं. मात्र, तिचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट येण्याआधीच खासगी प्रयोगशाळेतून निगेटीव्ह अहवाल घेत दुबईला पळून गेलीय.

भारताला धोका?

भारतात ओमायक्रॉनचे निर्बंध लागण्याआधी संसर्गाचा धोका असलेल्या देशांमधून आलेल्या 18 प्रवाशांना कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलंय. हे सर्व दिल्ली, मुंबई आणि चंदीगडमधील आहेत. त्यांचे नमुने ओमायक्रॉन चाचणीसाठी पाठवण्यात आलेत. या आठवड्यात भारतात आढळलेला पहिला ओमायक्रॉनचा रूग्ण आणि बंगळुरूमधील ४६ वर्षीय डॉक्टर दुबईला फरार झाले आहेत. यानंतर सरकारने नागरिकांना करोना विरोधी लसीचे २ डोस घेत नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.

ओमायक्रॉन विषाणूच्या चाचणीचे अहवाल येणे बाकी

मागील काही दिवसात परदेशातून आलेल्या आणि संशयित असलेल्या 12 प्रवाशांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यातील 8 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालंय. इतर 4 जणांचे अहवाल अद्याप जारी करण्यात आलेले नाही. त्यांचे नमुने ओमायक्रॉन विषाणूच्या चाचणीसाठी पुढे पाठवण्यात आलेत. याशिवाय दक्षिण अफ्रिकेतून आलेल्या 4 प्रवाशांसह त्यांच्या घरातील एकूण 9 जण जयपूरमध्ये कोरोना बाधित निघाले आहेत.

तज्ज्ञ डॉक्टरांकडून चिंता

भारतात 'ओमिक्रॉन'चे दोन रुग्ण आढळून आले आणि ते दोन्ही बरेही झाले. त्यापैकी एक जण हा विदेशी नागरिक होता. तो बरा होऊन मायदेशी परतला. त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांच्या टेस्ट या निगेटिव्ह आल्या आहेत. त्याने दक्षिण आफ्रिकेत प्रवास केला होता. तर दुसऱ्या व्यक्तीने कुठेही प्रवास केलेला नव्हता. पण तो आता बरा झालाय. मात्र, त्याच्या संपर्कात आलेले ५ जण पॉझिटिव्ह असल्याचं सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर देशातील तज्ज्ञ डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे.

omicron
ओमिक्रॉनचा धोका वाढतोय! प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे घरगुती उपाय

लहान मुलं आणि किशोरवयीन मुलांनी काळजी घेणे गरजेचे

अशा परिस्थितीत लक्षणं दिसत नसलेले नागरिक अत्यंत धोकादायक आहेत. पुरेशी जनजागृती नसल्याने लक्षणं दिसत नसलेले नागरिक अधिक संसर्ग पसरवतात. आता ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळल्यामुळे नागरिकांनी अधिक खबरदारी घेणं गरजेचं आहे. पुढील दोन आठवडे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. प्रत्येकाना स्वतःला लॉकडाउन करून घ्यावं. दक्षिण आफ्रिके ओमिक्रॉनचा अधिक संसर्ग हा लहान मुलं आणि किशोरवयीन मुलांमध्ये झाला आहे. यामुळे पालकांनी मुलांची खबरदारी घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येतोय

omicron
"...तर साहित्य संमेलनात कशाला जायचे?'' फडणवीसांची नाराजी

WHO म्हणतंय..

ओमिक्रॉन जगभर पसरण्याची शक्यता WHO कडून देण्यात आली आहे. तसेच कोरोनाचा नवा व्हेरियंट हा ऑमिक्रॉनपेक्षाही अत्यंत धोकादायक असल्याचं WHO ने म्हटलं आहे. कोरोनाच्या इतर व्हेरियंटपेक्षाही ऑमिक्रॉनचा दुप्पट वेगाने फैलाव होत आहे. त्यामुळे ऑमिक्रॉनला गांभीर्याने घ्या. नाहीतर गंभीर परिणामांना तोंड द्यावं लागणार असल्याचा इशारा WHO ने दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com