

Gas leak emergency Villagers shifted due to gas leak
esakal
ONGC Pipeline Gas Leakage Incident : आंध्र प्रदेशातील अंबेडकर कोनासीमा जिल्ह्यातील मालिकीपूरम तालुक्यातील पूर्व पालेम गावात ओएनजीसीच्या पाइपलाइनमधून गॅस गळती झाल्याची घटना समोर आली आहे. या गॅस गळतीमुळे परिसरात तीव्र वास पसरला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आपत्कालीन पथकांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.