esakal | चीनला पहिला झटका! ओप्पो फोनचा लाइव्ह लाँच इव्हेंट रद्द
sakal

बोलून बातमी शोधा

Oppo canceled smartphone launch event amidst India-China tension

चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरु लागल्यामुळे कंपनीने नवीन स्मार्टफोन लाइव्ह लाँच न करता केवळ एक 20 मिनिटांचा प्री-रेकॉर्डेड व्हिडिओ शेअर करुन Oppo Find X2 फोन भारतात लाँच केल्याची घोषणा केली आहे.

चीनला पहिला झटका! ओप्पो फोनचा लाइव्ह लाँच इव्हेंट रद्द

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बीजिंग : लडाखमध्ये झालेल्या हिंसेत 20 भारतीय जवान शहीद झाल्यानंतर भारतात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरु लागली आहे. याचा मोठा फटाका मोबाईल उत्पादक चिनी कंपनी ओप्पोला बसण्याची शक्यता असल्याने कंपनीने फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या भारतातील लाँचिंगसाठी आयोजित केलेला लाइव्ह इव्हेंट रद्द केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरु लागल्यामुळे कंपनीने नवीन स्मार्टफोन लाइव्ह लाँच न करता केवळ एक 20 मिनिटांचा प्री-रेकॉर्डेड व्हिडिओ शेअर करुन Oppo Find X2 फोन भारतात लाँच केल्याची घोषणा केली आहे.

कोविड-19ला हरवणं आता शक्य! मिळालं आतापर्यंतच सर्वात प्रभावी औषध

Oppo Find X2 स्मार्टफोन गुरुवारी संध्याकाळी लाँच केला जाणार होता. कंपनीकडून हा डिव्हाइस संध्याकाळी 4 वाजता एका ऑनलाइन ओन्ली इव्हेंटमध्ये लाँच केला जाणार होता. या कार्यक्रमाची लाइव्ह स्ट्रीमिंग YouTube वर होणार होती. पण, ही YouTube लिंक नंतर गायब झाली आणि लाइव्ह लाँचिंग रद्द झालं. लाइव्ह लाँचिंगऐवजी कंपनीने 20 मिनिटांचा एक प्री-रेकॉर्डेड व्हिडिओ शेअर करुन फोन भारतीय मार्केटमध्ये उपलब्ध झाल्याची घोषणा केली आहे. या व्हिडिओमध्ये भारतात करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ओप्पोने कशाप्रकारे मदत केली हे दखील कंपनीने दाखवले आहे.
चीनचे दुटप्पी राजकारण

loading image
go to top