CAA : विरोधकांमुळेच देशावर आली 'ही' वेळ; गृहमंत्र्यांची सडकून टीका

वृत्तसंस्था
रविवार, 12 जानेवारी 2020

लोकांना सत्य समजावून सांगण्याची क्षमता आमच्याकडे आहे. आमची प्रचार मोहीम संपल्यानंतर लोकांना नागरिकत्व कायद्याचे महत्त्व पटेल.

गांधीनगर : देशामध्ये अराजकता निर्माण करण्यासाठी विरोधकांकडून नागरिकत्व कायद्याबाबत चुकीचा प्रचार केला जात असल्याची घणाघाती टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशातील मुस्लिमांचे नागरिकत्व काढून घेणारी या कायद्यातील एक तरी तरतूद विरोधकांनी काढून दाखवावी, असे खुले आव्हान त्यांनी दिले. यावेळी त्यांच्या बोलण्याचा रोख हा कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल आणि डाव्या नेत्यांच्या दिशेने होता. 

- ममता बॅनर्जींनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; काय केले आवाहन?

विरोधकांकडे आता मुद्दाच राहिलेला नाही, त्यामुळेच ही मंडळी नागरिकत्व कायद्यासंदर्भात अपप्रचार करत असून, यामुळे देशामध्ये अराजकता निर्माण झाली आहे, असे शहा म्हणाले. गुजरात पोलिस दलाच्या विविध विकास प्रकल्पांचे शनिवारी (ता.11) शहांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्यांनी नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी पुस्तिकेच्या मुद्‌द्‌यावरून विरोधकांवर टीका केली.

शेजारील देशांमध्ये ज्यांना खटल्यांना सामोरे जावे लागत आहे, त्यांना भारतामध्ये आश्रय देण्यात येईल. याआधीच्या सरकारने निर्वासितांना कोणत्याही सोयीसुविधा दिल्या नव्हत्या. निर्वासितांना या सुविधा दिल्यास अन्य मंडळी नाराज होतील, असे त्यांना वाटत होते, असेही शहा यांनी स्पष्ट केले. 

- डोळ्यांत अश्रू येतील; वडिलांचं हेल्मेट घालून चिमुकली पोहोचली अंत्ययात्रेत

कार्यकर्त्यांना घरोघरी जाण्याचे आवाहन 

भाजप कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरामध्ये जावे आणि विरोधकांच्या अपप्रचाराचा भंडाफोड करावा. सध्या राजकारणामध्ये नरेंद्र मोदी यांचा भक्कम पर्याय निर्माण झाल्याने विरोधक जाणीवपूर्वक अपप्रचार करत असल्याचे शहा यांनी स्पष्ट केले.

- फरान अख्तरचं दुसरं लग्न होणार 'या' मराठमोळ्या मॉडेलशी

लोकांना सत्य समजावून सांगण्याची क्षमता आमच्याकडे आहे. आमची प्रचार मोहीम संपल्यानंतर लोकांना नागरिकत्व कायद्याचे महत्त्व पटेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. 370 वे कलम रद्द केल्यानंतर काश्‍मीर खोऱ्यात हिंसाचार झाला नाही, काश्‍मिरी जनतेने टीकाकारांना सडेतोड उत्तर दिल्याचे शहांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opposition falsehood on CAA created anarchy in India said home minister Amit Shah