

All-Party Meeting Marred by Opposition Protest Over Merger of Rebel Lawmakers
sakal
नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या २० खासदारांच्या विलीनीकरणाचा मुद्दा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा खासदारांच्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील प्रवेशाच्या मुद्द्याला आक्षेप घेत विरोधकांनी सर्वपक्षीय बैठकीतून सभात्याग केला. बंडखोरांच्या विलीनीकरणाला लोकसभाध्यक्षांनी मान्यता दिलेली नसताना, सरकारने कोणत्या बळावर बंडखोरांना आमंत्रित केले, असा आक्षेप तृणमूल काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला.