PM Modi at Ayodhya: "आपले रामलल्ला आता तंबूमध्ये राहणार नाहीत"; प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर PM मोदी भावूक

पंतप्रधानांच्या हस्ते राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा पार पडली.
Narendra Modi
Narendra Modi

अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा पार पडली. या सोहळ्यानंतर उपस्थितांना त्यांनी संबोधित केलं. यावेळी मोदी काहीक्षण भावूक झाले. "आपले रामलल्ला आता तंबूमध्ये राहणार नाहीत"असं मोदी यावेळी म्हणाले. (Our Ramlala will no longer live in tents PM Modi emotional speech after Pranapratistha ceremony)

रामलल्ला आता तंबूत राहणार नाहीत - मोदी

"आजच्या दिवसासाठी असंख्य लोकांचं बलिदान, त्याग आणि तपस्येनंतर आपले प्रभू राम आले आहेत. या शुभ प्रसंगाच्या सर्व देशवासियांना शुभेच्छा देतो. इश्वरी चेतनेचा साक्षी बनून तुमच्यासमोर मी आता उपस्थित आहे. किती काही सांगायचं आहे पण कंठ दाटून आला आहे, माझं शरिराचा अजूनही थरकाप होतो आहे, आपले रामलल्ला आता तंबूमध्ये राहणार नाहीत," अशा शब्दांत मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. (Latest Marathi News)

Narendra Modi
PM Modi in Ayodhya : पंतप्रधान मोदींनी मोदींनी केलं 11 दिवसांच्या व्रताचे उद्यापन, असा सोडला उपवास.. पाहा व्हिडिओ

श्रीरामाची मी माफी मागतो

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणतात, "आज मी प्रभू श्री रामाचीही माफी मागतो. आपल्या प्रयत्नात, त्यागात आणि तपश्चर्येमध्ये काहीतरी उणीव असावी की आपण हे काम इतक्या शतकांपासून करू शकलो नाही. आज हे काम पूर्ण झाले आहे. माझा विश्वास आहे की आज प्रभू श्री राम आपल्याला नक्कीच क्षमा करतील" (Marathi Tajya Batmya)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com