भारतात हल्ले घडवून आणण्याचा पाकिस्तानचा नवा डाव

वृत्तसंस्था
Monday, 24 August 2020

भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी पाकिस्तानने आता नवी खेळी करत आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय यासाठी सक्रिय असून, भारतातल्या गुंडांना हाताशी धरून हल्ले घडवून आणण्याची योजना आखत आहे.

नवी दिल्ली : भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी पाकिस्तानने आता नवी खेळी करत आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय यासाठी सक्रिय असून, भारतातल्या गुंडांना हाताशी धरून हल्ले घडवून आणण्याची योजना आखत आहे, अशी खळबळजनक माहिती उघड झाली आहे. सुरक्षा दलांनी दहशतवादी संघटनांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे.

Live Video: ट्रक आला वेगात अन् गेला वाहून पाण्यात

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, स्थानिक गुंड आणि गँगस्टर्स यांचे स्थानिक पातळीवर नेटवर्क असते. भारतात त्या नेटवर्कचा उपयोग करून घातपात घडविण्यासाठी पाकिस्तानच्या आयएसआयची योजना आहे. पंजबामध्ये काही घटना उघडकीस आल्याने गुप्तचर विभागाने सर्वच स्तरावर याबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. अनेक गँगस्टार्स हे फरार आहेत किंवा काही जेलमध्ये आहेत. त्या सगळ्यांशी संपर्क साधण्याचे काम दहशतवादी करत असून, त्यांची मदत घेत घातपात घडविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गाढविणीच्या एका लिटर दुधाची किंमत किती? घ्या जाणून...

दरम्यान, या गुंडांना पैशांचे अमिश दाखवून त्यांच्याकडून हे काम करून घेतले जाण्याची शक्यता आहे. किंवा त्यांच्या नेटवर्कचा वापर करून दहशतवादी घातपात घडविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, अशी माहिती गुप्तचर विभागांनी उघड केल्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवादी संघटनांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistan and isi terror groups turn to local indian gangsters to execute attacks in india says intelligence sources