Panch Kedar Temples : श्रावणात भेट देता येतील अशी उत्तराखंडमधील पंच केदार मंदिरं, पांडवांशी संबंधित आहेत मंदिरांच्या कथा

सध्या श्रावण महिना सुरू असून यंदा हा महिना 31 ऑगस्टपर्यंत
Panch Kedar Temples
Panch Kedar Templesesakal

Panch Kedar Temples : सध्या श्रावण महिना सुरू असून यंदा हा महिना 31 ऑगस्टपर्यंत आहे. या महिन्यात ज्योतिर्लिंगासोबतच पौराणिक महत्त्व असलेल्या मंदिरांमध्ये शिवाचे दर्शन आणि पूजा करण्याची परंपरा आहे. उत्तराखंडमध्ये भगवान शिवाची 5 प्राचीन मंदिरे आहेत, ज्यांना पंच केदार म्हणून ओळखले जाते. या पाच मंदिरांमध्ये केदारनाथ, तुंगनाथ, रुद्रनाथ, मध्यमहेश्वर आणि कल्पेश्वर महादेव यांचा समावेश आहे.

पंचकेदारच्या पाच मंदिरांपैकी चार मंदिरे हिवाळ्यात सुमारे सहा महिने बंद असतात, वर्षभर केवळ कल्पेश्वर महादेव मंदिरातच भाविकांना दर्शन घेता येते. आता ही पाचही मंदिरे भाविकांसाठी खुली झाली आहेत. जाणून घ्या उत्तराखंडच्या पंच केदारशी संबंधित खास गोष्टी...

Panch Kedar Temples
Travel Tips : हॉटेल बुक करण्यापूर्वी 'या' छोट्या पण महत्वाच्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा!

ही पंच केदारशी संबंधित पौराणिक मान्यता आहे

येथे प्रचलित असलेल्या पौराणिक कथांनुसार द्वापार युगातील महाभारत युद्धानंतर युधिष्ठिर, भीम, अर्जुन आणि नकुल-सहदेव हे पाच पांडव द्रौपदीसह हिमालयाच्या दिशेने आले. सर्व पांडवांना त्यांच्या पापांपासून मुक्ती हवी होती, म्हणून पांडवांनी भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी येथे तपश्चर्या केली. पांडवांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शिव प्रकट झाले.

Panch Kedar Temples
Sabudana Health Benefits : साबुदाणा खाणे खरंच फायदेशीर आहे का? जाणून घ्या तज्ञांचे मत

पांडवांना दर्शन दिल्यानंतर या परिसरात शिव बैलाच्या रूपात अंतर्धान पावले. पुढे त्यांच्या धडाचा वरचा भाग काठमांडूमध्ये दिसला. आता त्या ठिकाणी पशुपतीनाथ मंदिर आहे. उत्तराखंडमधील तुंगनाथ येथे शिवाच्या भुजांची, रुद्रनाथ येथे मुख, मध्यमहेश्वर येथे नाभी, कल्पेश्वर येथे केस आणि केदारनाथ येथे बैलाच्या कुबड्याची पूजा केली जाते. उत्तराखंडच्या या पाच ठिकाणांना पंच केदार म्हणतात.

Panch Kedar Temples
Ceiling fan cleaning tips: 5 मिनिटात स्मार्ट पद्धतीनं पंखा स्वच्छ करा, या ट्रिक्स वापरून पाहा

केदारनाथ धाम

केदारनाथ मंदिर, पंच केदारांपैकी एक, उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात आहे. केदारनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. उत्तराखंडच्या चारधाममध्येही त्याचा समावेश आहे. केदारनाथ धामशी संबंधित अनेक श्रद्धा प्रचलित आहेत. शिवपुराणातील कोटीरुद्र संहितेत असे लिहिले आहे की, प्राचीन काळी बदरीवनातील भगवान विष्णूचा अवतार नर-नारायण हे पार्थिव शिवलिंग बनवून दररोज भगवान शंकराची पूजा करत असत.

Panch Kedar Temples
Diabetes Tips : मधुमेही रुग्णांनी Coconut Water चं सेवन करावं का?

नर-नारायणाच्या भक्तीने प्रसन्न होऊन येथे भगवान शिव प्रकट झाले. शिवजींनी नर-नारायणाला वरदान मागायला सांगितले. तेव्हा नर-नारायणाने वरदान मागितले की, शिवजींनी येथे सदैव रहावे, जेणेकरून इतर भक्तांनाही सहज शिवजींचे दर्शन घेता येईल. हे ऐकून महादेव म्हणाले की, आतापासून ते इथेच राहतील आणि हा परिसर केदार क्षेत्र म्हणून प्रसिद्ध होईल.

Panch Kedar Temples
Kareena's Health Tips : हेल्दी राहण्यासाठी बेबो रोज रात्री न विसरता हा पदार्थ टाकून पिते दूध

या स्वयंभू शिवलिंगाची स्थापना केदारनाथ धाममध्ये झाल्याचे मानले जाते. स्वयंभू शिवलिंग म्हणजे जे स्वतः प्रकट झाले आहे. केदारनाथ मंदिर पांडव राजा जनमेजया याने बांधले होते. नंतर आदिगुरू शंकराचार्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला.

Panch Kedar Temples
Sabudana Health Benefits : साबुदाणा खाणे खरंच फायदेशीर आहे का? जाणून घ्या तज्ञांचे मत

तुंगनाथ मंदिर

तुंगनाथ मंदिर रुद्रप्रयाग जिल्ह्यात आहे. हे मंदिर शिवाच्या सर्व मंदिरांमध्ये सर्वोच्च स्थानावर आहे. तुंगनाथ महादेव मंदिर रुद्रप्रयाग जिल्ह्यात सुमारे 3600 मीटर उंचीवर आहे. येथील नैसर्गिक वातावरण हे मंदिराचे वैशिष्ट्य आहे. ट्रेकिंगची आवड असणार्‍या लोकांना हा परिसर खूप आकर्षित करतो. तुंगनाथ दर्शनासाठी सोनप्रयाग गाठावे लागते. यानंतर गुप्तकाशी, उखीमठ, चोपटा मार्गे तुंगनाथ मंदिरात जाता येते. एका मान्यतेनुसार माता पार्वतीनेही येथे तपश्चर्या केली होती. तुंगनाथ मंदिरापासून सुमारे 1.5 किमी अंतरावर चंद्रशिला आहे. त्याची उंची सुमारे 4000 मीटर आहे.

Panch Kedar Temples
White Shoes Cleaning Tips: पांढऱ्या शूजची चमक कायम ठेवायची असेल तर फॉलो करा 'या' टिप्स

रुद्रनाथ मंदिर

रुद्रनाथ मंदिर उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात आहे. रुद्रनाथ मंदिरात भगवान शंकराच्या मुखाची पूजा केली जाते. या मंदिराची उंची सुमारे 2290 मीटर आहे. येथील नैसर्गिक वातावरण भाविकांना शांती देते. रुद्रनाथ मंदिरात येण्यासाठी प्रथम गोपेश्वर गाठावे लागते. यानंतर गोपेश्वरपासून 60 किमी अंतरावर असलेल्या रुद्रनाथ मंदिरात जाता येते.

Panch Kedar Temples
Vastu Tips : घरातल्या सगळ्या अडचणी दूर करते एक चुटकी नमक; कसे वापरायचे ते पहा!

मध्यमहेश्वर मंदिर

हे मंदिर रुद्रप्रयाग जिल्ह्यात आहे. येथे भगवान शंकराच्या नाभीची पूजा केली जाते. मध्यमहेश्वर मंदिर सुमारे 3500 मीटर उंचीवर आहे. या मंदिराला भेट देण्यासाठी प्रथम गौरीकुंड गाठावे लागते. गौरीकुंडापासून सुमारे 16 किमीची चढण आहे, त्यानंतर आपण मध्यमहेश्वर मंदिरात पोहोचतो.

Panch Kedar Temples
Hair Growth Tips : व्हिटामिन ई केसांना लावण्याची योग्य पद्धत..!

कल्पेश्वर मंदिर

या मंदिरात भगवान शिवाच्या केसांची पूजा केली जाते. हे मंदिर उत्तराखंडच्या गढवाल भागात आहे. हे मंदिर जोशीमठ येथे आहे. त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे 2150 मीटर आहे. या मंदिरात शिवजींच्या केसांची पूजा केली जाते. पंचकेदार तीर्थक्षेत्रात कल्पेश्वर मंदिर पाचव्या क्रमांकावर आहे. या मंदिरात भाविक वर्षभरात कधीही दर्शनासाठी पोहोचू शकतात. हे दगडी मंदिर असून येथे जाण्यासाठी गुहेतून जावे लागते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com