
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचं शेवटच्या दिवसाचं कामकाजही विरोधकांच्या गदारोळामुळे स्थगित करण्यात आलं. पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कामकाज स्थगित करण्याआधी लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज सुरुवातीला १२ वाजेपर्यंत आणि त्यानंतर अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याची घोषणा केली. विरोधकांनी वोटर लिस्ट रिविजनच्या मुद्द्यावरून गोंधळ घातला. यामुळे कामकाज पुढे चालू ठेवलं गेलं नाही.